रायगड : शहापूर औद्योगिक क्षेत्रातील मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध; पोलिसांची दडपशाही

रायगड; जयंत धुळप : अलिबाग तालुक्यातील शहापूर गावात विस्तारीत औद्योगिक क्षेत्रातील पोहच रस्त्याच्या अतितातडीच्या मोजणीस शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. अतितातडीच्या मोजणी करिता ४०० पोलिसांच्या फौजफाट्यासह आज (दि.२३) सकाळी १० वाजण्याच्या सूमारास अधिकारी गावात दाखल झाले. यावेळी पोलिसांनी दडपशाही करत विरोध करणाऱ्या २० शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. अलिबाग प्रांताधिकारी मुकेश चव्हाण, भूमी अभिलेख विभागाचे भूमापन अधिकारी आणि … The post रायगड : शहापूर औद्योगिक क्षेत्रातील मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध; पोलिसांची दडपशाही appeared first on पुढारी.
#image_title

रायगड : शहापूर औद्योगिक क्षेत्रातील मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध; पोलिसांची दडपशाही

रायगड; जयंत धुळप : अलिबाग तालुक्यातील शहापूर गावात विस्तारीत औद्योगिक क्षेत्रातील पोहच रस्त्याच्या अतितातडीच्या मोजणीस शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. अतितातडीच्या मोजणी करिता ४०० पोलिसांच्या फौजफाट्यासह आज (दि.२३) सकाळी १० वाजण्याच्या सूमारास अधिकारी गावात दाखल झाले. यावेळी पोलिसांनी दडपशाही करत विरोध करणाऱ्या २० शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
अलिबाग प्रांताधिकारी मुकेश चव्हाण, भूमी अभिलेख विभागाचे भूमापन अधिकारी आणि एमआयडीसीचे अधिकारी गावात अचानक दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मोजणीस तीव्र विरोध केला. ही मोजणी करण्याबाबतच्या रितसर नोटीसा शेतकऱ्यांना दिलेल्या नाहीत, थेट मोजणीस येणे हे बेकायदेशीर आहे, आमचा या मोजणीस विरोध असून मोजणी रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. मोजणीकरिता अधिकाऱ्यांना शेतात येण्यास विरोध करणाऱ्या २० शेतकऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन पोयनाड पोलीस स्टेशनमध्ये नेले. यानंतर परिसरात तणाव आणखी वाढला. शेतकऱ्यांच्या वतीने अनिल पाटील यांनी याबाबत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन लेखी विरोध व्यक्त केला आहे. माजी आमदार पंडीतशेठ पाटील यांनी याबाबत पोयनाड पोलीसांकडून माहिती घेतली.
हेही वाचा : 

आजपासून राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता
रत्नागिरी : बहिरवली गावात घराला आग लागून लाखोंचे नुकसान
सिंधुदुर्ग : आंबडोस गावच्या प्रकाशिका नाईकची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड

The post रायगड : शहापूर औद्योगिक क्षेत्रातील मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध; पोलिसांची दडपशाही appeared first on पुढारी.

रायगड; जयंत धुळप : अलिबाग तालुक्यातील शहापूर गावात विस्तारीत औद्योगिक क्षेत्रातील पोहच रस्त्याच्या अतितातडीच्या मोजणीस शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. अतितातडीच्या मोजणी करिता ४०० पोलिसांच्या फौजफाट्यासह आज (दि.२३) सकाळी १० वाजण्याच्या सूमारास अधिकारी गावात दाखल झाले. यावेळी पोलिसांनी दडपशाही करत विरोध करणाऱ्या २० शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. अलिबाग प्रांताधिकारी मुकेश चव्हाण, भूमी अभिलेख विभागाचे भूमापन अधिकारी आणि …

The post रायगड : शहापूर औद्योगिक क्षेत्रातील मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध; पोलिसांची दडपशाही appeared first on पुढारी.

Go to Source