नेमकं चाललंय काय? राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची राजगुरूनगरला बैठक; अजित पवार उपस्थित

राजगुरूनगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अखिल भारतीय अध्यक्ष अजित पवार हे आज शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यातील कार्यकर्ते नेते यांच्या बैठका राजगुरुनगर येथे घेणार असून त्यासाठी त्यांचे आगमन झाले आहे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या घरी कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचे जोरदार स्वागत केले आहे कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्यानंतर अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्याची दाट शक्यता आहे.
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्याचप्रमाणे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, हडपसरचे आमदार चेतन तुपे यांच्या उपस्थितीत खेड , जुन्नर, आंबेगाव या तिन्ही तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली आहे. या प्रत्येक तालुक्याच्या बैठकीसाठी संबंधित तालुक्यातील २५० ते ३०० पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कार्यकर्ता मेळाव्याला उपमुख्य मंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या घरी आगमन. आमदार मोहिते पाटील, पत्नी सुरेखा ताई मोहिते पाटील व कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे.
हेही वाचा
टेंबलाई नाका सशस्त्र हल्ला प्रकरण : कोल्हापुरातील 45 तरुणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
Lok Sabha Election 2024 : सांगलीच्या जागेवरून सेना-काँग्रेसमध्येच जुंपली
ज्येष्ठांसह दिव्यांग मतदारांना टपालाद्वारे मतदान करता येणार
Latest Marathi News नेमकं चाललंय काय? राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची राजगुरूनगरला बैठक; अजित पवार उपस्थित Brought to You By : Bharat Live News Media.
