कोल्हापुरात समरजित घाटगेंच्या नावाची चर्चा, मंडलिक चर्चेसाठी मुंबईत

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : एकीकडे भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली जात असताना, दुसरीकडे त्यांना पाठिंबा देणार्‍या शिवसेनेच्या मतदारसंघांबाबत संभ्रमावस्था कायम आहे. खा. संजय मंडलिक यांच्यासह राज्यातील सहा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन आपल्या उमेदवारीबाबत आग्रह धरला. (Kolhapur Lok Sabha Election 2024) शिवसेनेतील बंडखोरीनंतर 13 खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी … The post कोल्हापुरात समरजित घाटगेंच्या नावाची चर्चा, मंडलिक चर्चेसाठी मुंबईत appeared first on पुढारी.

कोल्हापुरात समरजित घाटगेंच्या नावाची चर्चा, मंडलिक चर्चेसाठी मुंबईत

कोल्हापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : एकीकडे भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली जात असताना, दुसरीकडे त्यांना पाठिंबा देणार्‍या शिवसेनेच्या मतदारसंघांबाबत संभ्रमावस्था कायम आहे. खा. संजय मंडलिक यांच्यासह राज्यातील सहा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन आपल्या उमेदवारीबाबत आग्रह धरला. (Kolhapur Lok Sabha Election 2024)
शिवसेनेतील बंडखोरीनंतर 13 खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. तसेच केंद्रातील भाजप सरकारलाही या खासदारांनी पाठिंबा दिला आहे. यावेळी या सर्व खासदारांना लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा उमेदवारीचा शब्द दिल्याचे सांगण्यात येते. सध्या लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून, भाजप-शिवसेना महायुती आहे. त्यानुसार ज्या मतदारसंघांत ज्या पक्षाचे खासदार आहेत, तो मतदारसंघ त्या पक्षाला देण्यात यावा, अशी मागणी केली जात होती. मात्र, अद्याप लोकसभा मतदारसंघ आणि उमेदवारीबाबतही अनिश्चितता असल्याने खासदारही संभ्रमावस्थेत आहेत. परंतु, कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्यावर शिवसेनेचे खासदार ठाम आहेत.
पक्षादेशाचे पालन : घाटगे
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे समरजित घाटगे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पक्ष जो आदेश देईल त्याचे पालन करणार असल्याचे सांगितले. (Kolhapur Lok Sabha Election 2024)
Latest Marathi News कोल्हापुरात समरजित घाटगेंच्या नावाची चर्चा, मंडलिक चर्चेसाठी मुंबईत Brought to You By : Bharat Live News Media.