विद्यापीठातील 11 अध्यापकांवर 40 विभागांचा भार : एकाकडे एकच पदाची मागणी

पुणे :  समन्वयकपदांचा कार्यभार केवळ सात प्राध्यापकांकडे सोपविण्यात आला आहे. तसेच, काही विभागप्रमुखांकडे चार-चार विभागांच्या प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. परिणामी, नवीन नेतृत्व मिळण्याच्या प्रक्रियेला खीळ बसत आहे. त्यामुळे एका व्यक्तीला एकच पद देण्याचा धोरणात्मक निर्णय विद्यापीठाने घ्यावा, अशी मागणी अधिसभा सदस्यांकडून करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक येत्या रविवारी (दि. 24 मार्च) होणार आहे. … The post विद्यापीठातील 11 अध्यापकांवर 40 विभागांचा भार : एकाकडे एकच पदाची मागणी appeared first on पुढारी.

विद्यापीठातील 11 अध्यापकांवर 40 विभागांचा भार : एकाकडे एकच पदाची मागणी

पुणे :  समन्वयकपदांचा कार्यभार केवळ सात प्राध्यापकांकडे सोपविण्यात आला आहे. तसेच, काही विभागप्रमुखांकडे चार-चार विभागांच्या प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. परिणामी, नवीन नेतृत्व मिळण्याच्या प्रक्रियेला खीळ बसत आहे. त्यामुळे एका व्यक्तीला एकच पद देण्याचा धोरणात्मक निर्णय विद्यापीठाने घ्यावा, अशी मागणी अधिसभा सदस्यांकडून करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक येत्या रविवारी (दि. 24 मार्च) होणार आहे. त्यात विविध प्रस्ताव सादर केले जाणार आहेत. त्यात या प्रस्तावाचा समावेश आहे. विद्यापीठात 200 हून अधिक अध्यापक असताना व त्यापैकी 10 ते 15 वर्षांचा अनुभव असणारे अध्यापक बर्‍याचशा विभाग व केंद्रांत उपलब्ध असताना त्यांना डावलून केवळ 11 अध्यापकांकडे 40 विभागांचा पदभार सोपविण्यात आला आहे. परंतु, यामुळे अनेकांना दिलेल्या जबाबदारीला न्याय देणे शक्य होत नाही.
त्याचा विद्यापीठाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. असे केल्याने विद्यापीठात काही व्यक्तींकडे सत्तेचे केंद्रीकरण होत असून, हे विद्यापीठाच्या प्रगतीला घातक आहे. विद्यापीठात प्रशासकीय कार्यक्षमता वाढविण्यासाठी विद्यापीठात झालेले हे सत्तेचे केंद्रीकरण थांबवावे आणि विद्यापीठातील प्रत्येक शैक्षणिक विभाग व केंद्राच्या प्रमुखपदावर जास्तीत जास्त एक पूर्णवेळ पद द्यावे, अशी मागणी अधिसभा सदस्य हर्ष जगझाप यांनी केली आहे.
हेही वाचा

पक्षाने मंडलिकांना उमेदवारी दिल्यास प्रामाणिकपणे प्रचार करणार : कुपेकर
कोल्हापूर : जिल्ह्यातील ८२ गावे क्षयरोगमुक्त
प्राथमिक शाळांना जोडणार माध्यमिक शाळा; शासनाचा संयुक्‍त शाळांवर भर

Latest Marathi News विद्यापीठातील 11 अध्यापकांवर 40 विभागांचा भार : एकाकडे एकच पदाची मागणी Brought to You By : Bharat Live News Media.