Loksabha election 2024 : आघाडीकडून संधी मिळेल : वसंत मोरे

पुणे : पुण्यात महाविकास आघाडीकडून मला संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. कदाचित, महाविकास आघाडीच्या दुसर्‍या यादीत पुण्याचे नाव असेल, असे मत वसंत मोरे यांनी व्यक्त केले. तसेच, महाविकास आघाडीचे आत्ताचे वातावरण पुणेच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आहे. मला वाटते की, महाविकास आघाडी जिंकून येऊ शकते, असेही मोरे म्हणाले. मागील काही दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांनी मनसेला … The post Loksabha election 2024 : आघाडीकडून संधी मिळेल : वसंत मोरे appeared first on पुढारी.

Loksabha election 2024 : आघाडीकडून संधी मिळेल : वसंत मोरे

पुणे : पुण्यात महाविकास आघाडीकडून मला संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. कदाचित, महाविकास आघाडीच्या दुसर्‍या यादीत पुण्याचे नाव असेल, असे मत वसंत मोरे यांनी व्यक्त केले. तसेच, महाविकास आघाडीचे आत्ताचे वातावरण पुणेच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आहे. मला वाटते की, महाविकास आघाडी जिंकून येऊ शकते, असेही मोरे म्हणाले. मागील काही दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकल्यामुळे मोठी राजकीय चर्चा सुरू झाली. त्यानंतर मोरे यांनी विविध नेत्यांच्या भेटीगाठीवर भर दिला. मंगळवारी मोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते. पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक एकतर्फी होईल, यावर वसंत मोरेंनी या वेळी विश्वास व्यक्त केला. निवडणुकीला कमी दिवस वगैरे काही नाही. ज्या दिवशी वसंत मोरे रिंगणात उतरेल, त्या दिवशी पुणे लोकसभेच्या निवडणुकीत खर्‍या अर्थाने रंगत येईल, असेही मोरे यांनी नमूद केले.
फरक पडेल, पुणेकरांचा मला पाठिंबा : मोरे
काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. तुम्ही भाजपात या, नक्की निवडून याल, असे सांगितले होते. त्या वेळी मी तिथेच चंद्रकांत पाटील यांना सांगितले की, मी आजवर भाजपविरोधात निवडणूक लढवली आहे. प्रत्येक निवडणुकीत मला यश मिळाले आहे. माझ्या उमेदवारीमुळे काय फरक पडेल, हे पुणेकर दाखवून देतील, अशा शब्दांत पाटील यांना वसंत मोरे यांनी टोला लगावला.
हेही वाचा

‘शक्ती’कडून विरोधकांचा विनाश : पंतप्रधान मोदी
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला जन्मठेपेची शिक्षा; उच्च न्यायालयाचा निर्णय
अजित पवार गटाला ‘घड्याळ’ वापरण्यास सशर्त परवानगी; शरद पवार गटाला तुतारी

Latest Marathi News Loksabha election 2024 : आघाडीकडून संधी मिळेल : वसंत मोरे Brought to You By : Bharat Live News Media.