अमरावतीत प्रतिबंधित प्लास्टिकचा १० टन साठा जप्त 

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : अमरावती महापालिका आयुक्तांनी बुधवारी (दि.१९) शहरातील जवाहर गेट परिसरात आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने धाड टाकून प्रतिबंधित असलेला तब्बल 10 टन अवैध प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिक जप्तीची ही शहरातील सर्वात मोठी घटना आहे. महानगरपालिकेच्या प्लास्टीक विरोधी पथकाद्वारे ही कारवाईची मोहीम राबविण्यात आली. जप्त करण्यात … The post अमरावतीत प्रतिबंधित प्लास्टिकचा १० टन साठा जप्त  appeared first on पुढारी.

अमरावतीत प्रतिबंधित प्लास्टिकचा १० टन साठा जप्त 

अमरावती, Bharat Live News Media वृत्तसेवा : अमरावती महापालिका आयुक्तांनी बुधवारी (दि.१९) शहरातील जवाहर गेट परिसरात आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने धाड टाकून प्रतिबंधित असलेला तब्बल 10 टन अवैध प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिक जप्तीची ही शहरातील सर्वात मोठी घटना आहे.

महानगरपालिकेच्या प्लास्टीक विरोधी पथकाद्वारे ही कारवाईची मोहीम राबविण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या प्लास्टीक पॉलिथिनची किंमत ५ ते ६ लाखांच्या वर असल्याचे सांगण्यात आले. महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे सर्व प्लास्टीक विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
शासनाद्वारे प्रतिबंधित सिंगल युज प्लास्टीकचा हा साठा जवाहर गेट येथील विनोद ट्रेडर्स दुकान क्र.२ येथे असल्याची गुप्त माहिती महापालिकेच्या पथकाला मिळाली होती. त्या आधारावर संबंधित ठिकाणी धाड टाकून ही जप्तीची कारवाई करण्यात आली. संबंधित दुकान सील करण्यात आले असून दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही प्लास्टिक जप्तीची कारवाई महापालिका आयुक्त देविदास पवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, वैद्यकीय अधिकारी (स्‍वच्‍छता) डॉ.अजय जाधव, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पी.एम. मेहरे, बाजार परवाना अधिक्षक उदय चव्‍हाण, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्‍हे यांनी केली.
Latest Marathi News अमरावतीत प्रतिबंधित प्लास्टिकचा १० टन साठा जप्त  Brought to You By : Bharat Live News Media.