जळगाव : घरकुल मंजूर करण्यासाठी कुऱ्हाड या गावात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर कारवाई

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड या गावात एका व्यक्तीने आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्यासाठी दहा हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही रक्कम स्विकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. शेख हुसेन शेख बद्दु (वय 37) असे यातील संशयित आरोपीचे नाव आहे. पिपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु … The post जळगाव : घरकुल मंजूर करण्यासाठी कुऱ्हाड या गावात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर कारवाई appeared first on पुढारी.

जळगाव : घरकुल मंजूर करण्यासाठी कुऱ्हाड या गावात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर कारवाई

जळगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड या गावात एका व्यक्तीने आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्यासाठी दहा हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही रक्कम स्विकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. शेख हुसेन शेख बद्दु (वय 37) असे यातील संशयित आरोपीचे नाव आहे. पिपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पाचोरा तालुक्यातील कुन्हाड यातील तक्रारदार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आवास योजना अंतर्गत घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी गावातील शेख हुसेन शेख बद्दु याच्याकडून माहिती घेतली. त्याने पंचायत समिती पाचोरा येथील अधिकारी यांचे सोबत ओळख असल्याचे सांगून मोदी आवास योजनेंतर्गत घरकुल मंजुर करून देण्यासाठी 10 हजाराची रुपये मागितले. त्यानंतर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून 11 रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता यातील आरोपी आर्थिक फसवणूक करत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर 19 रोजी हुसैन शेख यांना कुन्हाड बु गावी 10 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. शेख याच्यावर पिपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
 पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख, याच्यासह पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे ,सफौ दिनेशसिंग पाटील, चापोहेकॉ सुरेश पाटील, पोना किशोर महाजन पोना बाळू मराठे, पोकॉ प्रणेश ठाकूर, यांनी सापळा यशस्वी केला. तर त्यांना मदत पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, पो.ह.रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर ,पो.कॉ. प्रदीप पोळ, पोकॉ अमोल सूर्यवंशी, पोकॉ राकेश दुसाने हे या घटनेचा तपास करक आहेत.
Latest Marathi News जळगाव : घरकुल मंजूर करण्यासाठी कुऱ्हाड या गावात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर कारवाई Brought to You By : Bharat Live News Media.