ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची बदली; मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाची नवी जबाबदारी

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्यानंतर आता ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची देखील बदली करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेत दोन वर्ष आणि ठाणे महापालिकेत दीड वर्ष असा आयुक्तपदाचा साडेतीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे. बांगर यांच्यावर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाची … The post ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची बदली; मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाची नवी जबाबदारी appeared first on पुढारी.

ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची बदली; मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाची नवी जबाबदारी

ठाणे; Bharat Live News Media वृत्तसेवा : मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्यानंतर आता ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची देखील बदली करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेत दोन वर्ष आणि ठाणे महापालिकेत दीड वर्ष असा आयुक्तपदाचा साडेतीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे. बांगर यांच्यावर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ही बदली करण्यात आली असली तरी ठाण्यातून बदली व्हावी यासाठी गेले काही महिने ते स्वतः प्रयत्नशील होते.
ऐन कोरोनाच्या काळात ठाणे महापालिका आयुक्त पदी रुजू झालेले तत्कालीन पालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांच्यानंतर २०२२ साली अभिजित बांगर यांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्त पदाची सूत्रे हातात घेतली होती. बांगर यांनी आपल्या ठाणे महापालिकेच्या कार्यकाळात दोन वेळा पालिकेचा अर्थसंकल्प सादर केला असून कोरोनामुळे ठाणे महापालिकेची बिघडलेली आर्थिक परिस्थिती रुळावर आणण्यासाठी त्यांनी खर्चावर नियंत्रण आणले होते. याशिवाय बांगर यांनी अधिकाऱ्यांमध्ये शिस्तीचे वातावरण आणण्याचा देखील पुरेपूर प्रयत्न केला. दीड वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी एकही नव्या प्रकल्पाची घोषणा केली नाही.
राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या ठाण्यात त्यांना फारसे जुळवून घेता आले नाही. ठाणे महापालिकेच्या कारभारात राजकीय मंडळींचा झालेला अतिरिक्त हस्तक्षेप त्यांना फारसा रुचत नव्हता. यासाठी त्यांनी दोन वेळा बदलीसाठीही प्रयत केले असल्याचे समजते. मात्र त्यांना बदली देण्यात आली नव्हती. मात्र आता नवी मुंबई आणि ठाणे महापालिका असा दोन्ही महापालिकांच्या साडेतीन वर्षाचा कार्यकाळ पकडून राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने त्यांची बदली मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांच्या जागेवर केली आहे.
ठाणे महापालिका आयुक्त पदासाठी या नावांची चर्चा…
बांगर यांची बदली झाल्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त पदी कोण येणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे. ठाणे पालिकेच्या आयुक्तपदी डॉक्टर सुधाकर शिंदे, पी. वेलरासू आणि सौरभ राव तसेच अभिषेक राऊत या चौघांच्या नावाची चर्चा असून यामध्ये पी.वेलरासू आणि अभिषेक राऊत यांची नावे आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
Latest Marathi News ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची बदली; मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाची नवी जबाबदारी Brought to You By : Bharat Live News Media.