‘पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर’, विक्रमी उष्णतेवर ‘यूएन’चा रेड अलर्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेने (WMO) ग्लोबल वार्मिंग बाबत रेड अलर्ट जारी केला आहे. संघटनेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालात 2023 मध्ये हरितगृह वायू, जमीन आणि पाण्याचे तापमान आणि हिमनद्या, समुद्रातील बर्फ वितळण्यात अभूतपूर्व वाढ झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. 2023 मध्ये उष्णतेने सर्व विक्रम मोडले आहेत. जागतिक हवामान … The post ‘पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर’, विक्रमी उष्णतेवर ‘यूएन’चा रेड अलर्ट appeared first on पुढारी.

‘पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर’, विक्रमी उष्णतेवर ‘यूएन’चा रेड अलर्ट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेने (WMO) ग्लोबल वार्मिंग बाबत रेड अलर्ट जारी केला आहे. संघटनेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालात 2023 मध्ये हरितगृह वायू, जमीन आणि पाण्याचे तापमान आणि हिमनद्या, समुद्रातील बर्फ वितळण्यात अभूतपूर्व वाढ झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
2023 मध्ये उष्णतेने सर्व विक्रम मोडले आहेत. जागतिक हवामान संघटनेने (WMO) मंगळवारी आपला वार्षिक हवामान स्थिती अहवाल प्रसिद्ध केला. 2023 हे आत्तापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष असेल असे सूचित करण्यात आले आहे. तर 2014 ते 2023 हा काळ सर्वात उष्ण दशक म्हणून नोंदवला गेला आहे. या 10 वर्षांत महासागरांवर उष्णतेच्या लाटांचा परिणाम झाला. तसेच हिमनद्यांना बर्फाचे विक्रमी नुकसान झाले.
युनायटेड नेशन्सचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस म्हणाले की, जागतिक हवामान संघटनेच्या या अहवालावरून आपली पृथ्वी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते. आपली पृथ्वी पुढील संकटांचे संकेत देत आहे. जीवाश्म इंधन प्रदूषण चार्ट हे दर्शविते की हवामानाचे किती नुकसान होत आहे. पृथ्वीवर किती वेगाने बदल होत आहेत याचा इशारा आहे.’
डब्ल्यूएमओ प्रमुख आंद्रिया सेलेस्टे साऊलो यांनी चेतावणी देत म्हटलंय की, गेल्या वर्षी पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळचे सरासरी तापमान पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा 1.45 डिग्री सेल्सिअस जास्त होते. आता ते धोकादायक 1.5 डिग्री सेल्सिअस जवळ आहे. ही आकडेवारी पॅरिस कराराच्या 1.5 डिग्री सेल्सिअसच्या खालील मर्यादेच्या इतक्या जवळ कधीच नव्हती. पॅरिस हवामान करार 2015 मध्ये सदस्य राष्ट्रांनी मान्य केला होता.
डब्ल्यूएमओ प्रमुख आंद्रिया सेलेस्टे साऊलो पुढे म्हणाले, ‘या अहवालाकडे जगाने रेड अलर्ट म्हणून पाहिले पाहिजे. उष्णतेचा विक्रम पुन्हा एकदा मोडला गेला आहे.’
हेही वाचा :

Marriage Case : पैशांचा हव्यास! बहिणीने केले भावाशीच लग्न, सरकारी योजनेसाठी मोठा खटाटोप
बाळा नांदगावकर यांची लोकसभा लढवण्याबाबत भूमिका जाहीर; म्हणाले ‘मी गडचिरोलीतून…’
Lok Sabha polls 2024 : पंजाबमध्‍ये भाजप-अकाली दल युतीची चर्चा

Latest Marathi News ‘पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर’, विक्रमी उष्णतेवर ‘यूएन’चा रेड अलर्ट Brought to You By : Bharat Live News Media.