कोल्हापूर : पंडेवाडी येथे शेणी लावण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा कालव्यात पडून मृत्यू

सरवडे; Bharat Live News Media वृत्तसेवा : पंडेवाडी ता.राधानगरी येथील विवाहितेचा उजव्या कालव्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली. तेजस्विनी दिगंबर पाटील (वय.२७) असे या महिलेचे नाव आहे. या घटनेची राधानगरी पोलीसांत नोंद करण्यात आली आहे.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्विनी ही विवाहित महिला सायंकाळी शेणी लावण्यासाठी दुधगंगा उजव्या कालव्याच्या काठावर गेली होती. यावेळी अचानक तिचा तोल जाऊन कालव्याच्या वाहत्या पाण्यात पडली आणि बुडून मृत्यू झाला. तिला वाचविण्यासाठी ग्रामस्थांनी आटोकाट प्रयत्न केले परंतु तिच्या नाकातोंडात पाणी गेल्याने जागीच मृत्यू झाला. या विवाहित तरुणीच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली असून ग्रामीण रुग्णालय सोळांकूर येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला. तेजस्विनीचा मृतदेह पाहताच नातेवाईक व मुलांनी केलेल्या आक्रोशाने परिसरातील नागरिकांना शोक अनावर झाला. यामुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Latest Marathi News कोल्हापूर : पंडेवाडी येथे शेणी लावण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा कालव्यात पडून मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.
