हिंगोली : पोतरा ते आखाडा बाळापूर मार्गावर ट्रकची दुचाकीला धडक होऊन अपघात; दोघे ठार

आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील पोतरा ते आखाडा बाळापूर रस्त्यावर आज (दि. १९)  सकाळी ११ वाजता दुचाकी व आयशर ट्रक अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. रंगराव सुदामराव मस्के व नागेश साहेबराव लेकुळे अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. बाळापुर पोतरा रस्त्यावर आज सकाळी ११ वाजता बाळापूरहून बोर्डाकडे जात असता पोतरा रस्त्यावरील … The post हिंगोली : पोतरा ते आखाडा बाळापूर मार्गावर ट्रकची दुचाकीला धडक होऊन अपघात; दोघे ठार appeared first on पुढारी.

हिंगोली : पोतरा ते आखाडा बाळापूर मार्गावर ट्रकची दुचाकीला धडक होऊन अपघात; दोघे ठार

आखाडा बाळापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील पोतरा ते आखाडा बाळापूर रस्त्यावर आज (दि. १९)  सकाळी ११ वाजता दुचाकी व आयशर ट्रक अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. रंगराव सुदामराव मस्के व नागेश साहेबराव लेकुळे अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
बाळापुर पोतरा रस्त्यावर आज सकाळी ११ वाजता बाळापूरहून बोर्डाकडे जात असता पोतरा रस्त्यावरील वीज महावितरण कार्यालयाजवळ ट्रक क्रमांक एम एच ४० बी एल १९२४ व दुचाकी क्रमांक एम एच २६ ए ८२५७ यांचा अपघात झाला, या अपघातात ट्रक चालकांनी दुचाकी ला पाठीमागून जोराची धडक देऊन भीषण अपघात झाला.
अपघातात रंगराव सुदामराव मस्के वय ३८ वर्ष राहणार कुपटी ता, वसमत यांचा जागीच मृत्यू झाला तर नागेश साहेबराव लेकुळे वय १२ वर्षे राहणार कुपटी हा अपघातामध्ये गंभीर जखमी झाला होता याला पोतरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता दाखल केले पण उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळतात आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेख माजिद व जमादार नागरे, शिवाजी पवार, व कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन अपघाताची पाहणी केली सदरील अपघातातील ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून चालक मात्र फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात सायं ६:३० वाजता साहेबराव व्यंकटराव लेकुळे रा, कुपटी ता, वसमत याच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात रंगराव सुदामराव मस्के व नागेश साहेबराव लेकुळे यांना गंभीर मार लागून त्यांच्या मरणास कारणीभूत झाला म्हणून अपघातातील वाहन व चालक यांच्यावर भा,द,वि,प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
Latest Marathi News हिंगोली : पोतरा ते आखाडा बाळापूर मार्गावर ट्रकची दुचाकीला धडक होऊन अपघात; दोघे ठार Brought to You By : Bharat Live News Media.