विजापूर : मारडगी तांडानजीक अनैतिक संबंधाच्या संशयातून दोघांचा निर्घृण खून

चिकोडी; Bharat Live News Media वृत्तसेवा : विजापूर जिल्ह्यातील निडगुंदी तालुक्यातील मारडगी तांडानजीक अनैतिक संबंधाच्या संशयावरून दुहेरी खून झाल्याची घटना घडली आहे.
सोमनिंगप्पा कल्लाप्पा कुंभार (वय 35 ) व पार्वती तळवार (वय 38) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही गणी येथील रहीवासी आहेत. दोघेजण वेगवेगळ्या कुटुंबातील असून, दोघांचा एकाच ठिकाणी खून करण्यात आल्याने खळबळ माजली. अनैतिक संबंधातून खून झाल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेची माहिती मिळताच निडगुंदी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेमुळे विजापूर जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
Latest Marathi News विजापूर : मारडगी तांडानजीक अनैतिक संबंधाच्या संशयातून दोघांचा निर्घृण खून Brought to You By : Bharat Live News Media.
