धाराशिव: दोन दिवसांत लाच घेताना तिघे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : जात पडताळणी प्रमाणपत्राची डिजिटल स्वाक्षरी असलेली प्रत देण्यासाठी 3200 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अधिकार्‍यासह पंटरला अटक करण्यात आली. Dharashiv Bribery Case याबाबत पोलिसांनी सांगितले की, जात पडताळणी कार्यालयातील प्रकल्प सहायक बुध्दभूषण माने यांनी तक्रारदाराच्या मुलीचे डिजिटल स्वाक्षरी असलेले जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी 3 हजार 200 रुपयांची लाच मागितली होती. ती लाच तक्रारदाराने … The post धाराशिव: दोन दिवसांत लाच घेताना तिघे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात appeared first on पुढारी.
धाराशिव: दोन दिवसांत लाच घेताना तिघे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

धाराशिव, Bharat Live News Media वृत्तसेवा : जात पडताळणी प्रमाणपत्राची डिजिटल स्वाक्षरी असलेली प्रत देण्यासाठी 3200 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अधिकार्‍यासह पंटरला अटक करण्यात आली. Dharashiv Bribery Case
याबाबत पोलिसांनी सांगितले की, जात पडताळणी कार्यालयातील प्रकल्प सहायक बुध्दभूषण माने यांनी तक्रारदाराच्या मुलीचे डिजिटल स्वाक्षरी असलेले जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी 3 हजार 200 रुपयांची लाच मागितली होती. ती लाच तक्रारदाराने पंचासमक्ष पंटर शाहबाज शफीक सय्यद (रा. आगडगल्‍ली, धाराशिव) याच्यामार्फत सोमवारी (दि. 18) दिली. माने यांनीही ती स्वीकारली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांनाही अटक केली. याबाबत आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Dharashiv Bribery Case
Dharashiv Bribery Case वाशीच्या दुय्यम निबंधक कार्यालयात लिपीक जाळ्यात
दरम्यान, मंगळवारी (दि. 19) केलेल्या दुसर्‍या एका कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वाशी येथे दुय्यम निबंधक कार्यालयातील (रजिस्ट्री ऑफीस) प्रभारी अधिकारी तथा लिपीकाला 10 हजार रुपयांची लाच घेताना पकडले. कडकनाथवाडी येथील एका शेतकर्‍याच्या दोन दस्त नोंदणी करण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे 10 हजार रुपयांची लाच प्रभारी दुय्यम निबंधक संजय भीमराव गडकर याने मागितली होती. पंचांसमक्ष त्याने ती स्वीकारल्याने पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही कारवाया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.
हेही वाचा 

Nanded News : धाराशिव येथील डॉक्टर दाम्पत्य नांदेडमध्ये लाच घेताना ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
Dharashiv Politics : ‘ऊर्जा केंद्र’ भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसला तारणार कोण?; धाराशिवमधील कार्यकर्ते चिंतेत
धाराशिव : डॉ. कांबळे राष्ट्रवादीतून शिवसेनेत; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन

Latest Marathi News धाराशिव: दोन दिवसांत लाच घेताना तिघे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात Brought to You By : Bharat Live News Media.