‘ते’ वक्तव्य काही मित्रांना उद्देशून: युगेंद्र पवार यांचा खुलासा

बारामती : पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या वक्तव्याची चर्चा सोमवारपासून सुरु आहे. याबाबत श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. बापू (श्रीनिवास पवार) हे काही जुने मित्र व काही ग्रामस्थांना उद्देशून बोलले होते. परंतु त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे युगेंद्र पवार म्हणाले. आमची आजी आशाताई … The post ‘ते’ वक्तव्य काही मित्रांना उद्देशून: युगेंद्र पवार यांचा खुलासा appeared first on पुढारी.
‘ते’ वक्तव्य काही मित्रांना उद्देशून: युगेंद्र पवार यांचा खुलासा

बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या वक्तव्याची चर्चा सोमवारपासून सुरु आहे. याबाबत श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. बापू (श्रीनिवास पवार) हे काही जुने मित्र व काही ग्रामस्थांना उद्देशून बोलले होते. परंतु त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे युगेंद्र पवार म्हणाले. आमची आजी आशाताई यांच्या वाढदिवसानिमित्त ते दोघेही (अजित पवार व श्रीनिवास पवार) सोमवारी एकत्र होते, असेही युगेंद्र यांनी स्पष्ट केले. Yugendra Pawar

बारामतीत पत्रकारांशी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, माझ्या वडिलांना बारामतीकर जवळून ओळखतात. ते सरळ, साधे आहेत. जे मनात येईल, ते स्पष्ट बोलून जातात. पण काटेवाडीतील त्यांचे वक्तव्य ट्विस्ट केले गेले. त्यातून वेगळा अर्थ राज्यभर गेला.Yugendra Pawar

अजितदादा त्यांचे मोठे बंधू आहेत. लहानपणापासून ते एकमेकांना साथ देत आले आहेत. वैयक्तिक जीवनात यापुढेही देतील. शेवटी ते भावाचे नाते आहे. एवढ्या सहजपणे ते तुटत नसते. काही वेळेला राजकीय परिस्थिती वेगळी असते. त्यानुसार माझ्या वडिलांनी आत्ता भूमिका घेतली आहे.

काटेवाडीतील जुने मित्र व काही ग्रामस्थांनी माझ्या वडिलांना या बैठकीत, अजित पवार यांच्याकडून पुढील काळात कोणकोणती कामे होवू शकतील, हे सांगत होते. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ते नेहमीच मोठ्या भावाचा आदर करत आले आहेत, तो व्हिडिओ नीटपणे पाहिला तर बापू जे बोलले, ते दादांना उद्देशून नव्हतेच, असा दावाही युगेंद्र यांनी केला.

सोमवारी आमच्या आजी आशाताई यांचा वाढदिवस होता. त्यावेळी हे भाऊ-भाऊ एकत्रही आले होते. त्यांच्यात चर्चा झाली. ते नेहमीच एकमेकांना समजून घेतात. पण शेवटी राजकारण व कुटुंब वेगळे ठेवले पाहिजे, असेही युगेंद्र म्हणाले.

श्रीनिवास पवार यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार गटाकडून सूज्ञ बारामतीकर नावाने काढण्यात आलेल्या निनावी पत्राबद्दल युगेंद्र म्हणाले, अशी पत्रे कोण काढतोय, ती कधी समोर येतात, हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगले माहित आहे. पत्नी व मुलाच्या राजकीय भवितव्याच्या चिंतेने श्रीनिवास पवार बोलले, असा उल्लेख पत्रात आहे, यावर युगेंद्र यांनी मी राजकारणात आहे का ? असा प्रतिसवाल केला. यापुढील काळात शरद पवार यांच्या व्यासपीठावर अजित पवार यांच्या मातोश्री दिसतील, असे बोलले जात आहे, या प्रश्नावर मला त्याची माहिती नाही, असे उत्तर त्यांनी दिले.

हेही वाचा 

Srinivas Pawar On Ajit Pawar | सूज्ञ बारामतीकरांचे मत…; श्रीनिवास पवार यांच्या टीकेला अजित पवार गटाकडून उत्तर
अजित पवार गटाला ‘घड्याळ’ चिन्‍ह; पण सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला ‘हा’ आदेश
अजित पवारांवरील टीकेने भुजबळ व्‍यथित; म्‍हणाले, “रक्‍ताची नाती….”

Latest Marathi News ‘ते’ वक्तव्य काही मित्रांना उद्देशून: युगेंद्र पवार यांचा खुलासा Brought to You By : Bharat Live News Media.