बाळा नांदगावकर यांची लोकसभा लढवण्याबाबत भूमिका जाहीर; म्हणाले ‘मी गडचिरोलीतून…’

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या दोन दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे हे महायुतीत सामील होणार अशा चर्चा आहेत. आज सकाळी त्यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना उधाण आलेलं आहे. मनसे नेते बाळा नांदगाववकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधत असताना म्हणाले की, येत्या दोन दिवसात आमची भूमिका स्पष्ट होईल. माझी लोकसभा लढवण्याची तयारी आहे … The post बाळा नांदगावकर यांची लोकसभा लढवण्याबाबत भूमिका जाहीर; म्हणाले ‘मी गडचिरोलीतून…’ appeared first on पुढारी.
बाळा नांदगावकर यांची लोकसभा लढवण्याबाबत भूमिका जाहीर; म्हणाले ‘मी गडचिरोलीतून…’

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : गेल्या दोन दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे हे महायुतीत सामील होणार अशा चर्चा आहेत. आज सकाळी त्यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना उधाण आलेलं आहे. मनसे नेते बाळा नांदगाववकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधत असताना म्हणाले की, येत्या दोन दिवसात आमची भूमिका स्पष्ट होईल. माझी लोकसभा लढवण्याची तयारी आहे पण राज ठाकरे यांचा जो आदेश असेल तोच आमचा अंतिम असेल असे नांदगावकर यावेळी म्हणाले.
बाळा नांदगावकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, राज ठाकरे आणि अमित शहा यांची आज भेट झाली. या भेटीदरम्यान सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे पुढील एक दोन दिवसात काही महत्त्वपूर्ण निर्णय होतील. ही लोकसभा निवडणूक लढवायचे असल्याच कोणाला उमेदवारी द्यायची हा संपर्ण निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे. राज ठाकरे जो आदेश तो मान्य असेल. त्यांनी आदेश दिला तर गडचिरोलीतूनही लढण्याची माझी तयारी आहे. आमची आजच्या बैठकीनंतर आणखी एक बैठक होईल त्यानंतर जागेवर शिक्कामोर्तब होईल असंही नांदगावकर यावेळी म्हणाले.
Latest Marathi News बाळा नांदगावकर यांची लोकसभा लढवण्याबाबत भूमिका जाहीर; म्हणाले ‘मी गडचिरोलीतून…’ Brought to You By : Bharat Live News Media.