धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषणवर निर्बंध ; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

धुळे : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तींने, संघटनेने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने, हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण, लाऊडस्पिकर वापरण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण … The post धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषणवर निर्बंध ; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश appeared first on पुढारी.

धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषणवर निर्बंध ; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा- जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तींने, संघटनेने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने, हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण, लाऊडस्पिकर वापरण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी निर्गमित केले आहे.
जिल्हादंडाधिकारी गोयल यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये नमूद केल्यानुसार सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यांच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण, लाऊडस्पिकर वापरण्यावर निवडणुक प्रक्रिया पूर्णहोईपर्यंत निर्बंध घालीत असल्याचे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी कळविले आहे.
हेही वाचा-

बीड: मनकर्णिका तलावाने तळ गाठला; पिंपळनेरसह १५ गावांना पाणी टंचाईचे चटके
Nagpur Lok Sabha Elections 2024 : नागपुरात नितीन गडकरीविरोधात काँग्रेसचा ‘हा’ नेता रिंगणात

Latest Marathi News धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषणवर निर्बंध ; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश Brought to You By : Bharat Live News Media.