तामिळनाडूमध्ये भाजपची पीएमकेसोबत युती! पीएम मोदींना किती फायदा होईल?
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तामिळनाडूमध्ये पट्टाली मक्कल काची (पीएमके) सोबत युती केली आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप झाले आहे. डॉ. एस. रामदास अंबुमणी यांच्या नेतृत्वाखालील पीएमके राज्यातील 10 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. या युतीच्या जोरावर भाजपला दक्षिण भारतात आपले अस्तित्व मजबूत करण्यास मदत होईल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई आणि पीएमकेचे संस्थापक रामदास अंबुमणी यांनी त्यांच्या थिलापुरम येथील निवासस्थानी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी डॉ. एस रामदास म्हणाले की, ‘देशाच्या हितासाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही एनडीएमध्ये सामील झालो आहोत. तामिळनाडूतील जनतेला बदलाची अपेक्षा आहे आणि ती पूर्ण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. एनडीए केवळ तामिळनाडूतच नव्हे तर संपूर्ण भारतात मोठा विजय मिळवेल आणि पीएम मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील,’ असे त्यांनी सांगितले. (Lok Sabha Elections 2024)
भाजपचे अन्नामलाई यांनी, ‘पीएमकेने एनडीएला 400 जागा जिंकण्यास मदत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. ते भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील झाल्याने तामिळनाडूतील राजकीय परिस्थिती बदलली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तामिळनाडूमध्ये बदल घडवून आणणे हे आपले उद्दिष्ट आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएला मोठा विजय मिळेल. यासोबतच 2026 मध्ये राज्यात मोठा राजकीय बदल होणार आहे,’ असा विश्वास व्यक्त केला आहे. (Lok Sabha Elections 2024)
पीएमके हा वन्नियार समाजाचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष आहे. उत्तर तामिळनाडूच्या जिल्ह्यांमध्ये या पक्षाचा लक्षणीय प्रभाव आहे. या पक्षाचे पाच आमदार असून तामिळनाडू विधानसभेत पीएमके हा चौथा सर्वात मोठा पक्ष आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला एकूण 3.8 टक्के मते मिळाली होती. हेच राजकीय समीकरण जुळवून भाजपने पीएमकेला एनडीएमध्ये सामील करून घेतले आहे. तसेच या पक्षाला लोकसभेच्या 10 जागाही दिल्या. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सालेममध्ये मंगळवारी (दि.19) जाहीर सभा आहे. तेथे पीएमकेचे नेते डॉ. एस. रामदास अंबुमणी पंतप्रधानांच्या भाषणावेळी सहभागी होणार आहेत.
तामिळनाडूमध्ये भाजप 29 जागा लढवणार
पीएमकेचे अध्यक्ष रामदास म्हणाले, ‘पीएमके गेल्या दहा वर्षांपासून दिल्लीतील एनडीएचा भाग आहे. परंतु आता आम्ही प्रत्यक्षपणे एनडीएत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. पीएमकेने तामिळनाडूमध्ये भाजपसोबत युती केली आहे आणि जागावाटप निश्चित केले आहे. भाजप राज्यातील 39 पैकी 29 जागांवर निवडणूक लढवणार असून पीएमके 10 जागांसह रिंगणात उतरणार आहे.’
After PMK founder S Ramadoss and Tamil Nadu BJP President K Annamalai signed the seat-sharing agreement, K Annamalai says “It is a strong alliance. The political scenario has changed due to the decision taken by the PMK to align with the BJP-led NDA. We came to Thailapuram from… pic.twitter.com/hFRIknsPik
— ANI (@ANI) March 19, 2024
The post तामिळनाडूमध्ये भाजपची पीएमकेसोबत युती! पीएम मोदींना किती फायदा होईल? appeared first on Bharat Live News Media.