‘बीजेपी महाराष्ट्र’ नावाने फेसबुकवर ग्रुप बनवून आक्षेपार्ह पोस्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासाठी पक्षाचे नाव, चिन्ह यांचा गैरवापर करीत फेसबुकवर ग्रुप तयार केला. तसेच या ग्रुपच्या माध्यमातून भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरून पक्षाबाबत बदनामीकारक मजकूर लिहला. त्यामुळे सायबर पोलिस ठाण्यात फेसबुक ग्रुप तयार करणाऱ्यास इतर फेसबुक खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता … The post ‘बीजेपी महाराष्ट्र’ नावाने फेसबुकवर ग्रुप बनवून आक्षेपार्ह पोस्ट appeared first on पुढारी.
‘बीजेपी महाराष्ट्र’ नावाने फेसबुकवर ग्रुप बनवून आक्षेपार्ह पोस्ट

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासाठी पक्षाचे नाव, चिन्ह यांचा गैरवापर करीत फेसबुकवर ग्रुप तयार केला. तसेच या ग्रुपच्या माध्यमातून भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरून पक्षाबाबत बदनामीकारक मजकूर लिहला. त्यामुळे सायबर पोलिस ठाण्यात फेसबुक ग्रुप तयार करणाऱ्यास इतर फेसबुक खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा मध्य मंडळ नाशिक महानगराचे अध्यक्ष अक्षय हेमंत गांगुर्डे (२८) यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, संशयिताने बीजेपी महाराष्ट्र या नावाने फेसबुकवर ग्रुप तयार केला. या ग्रुपवर पक्षाच्या नावाचा, चिन्हाचा गैरवापर करुन बदनामीकारक पोस्ट अपलोड होत असल्याचे आ. देवयानी फरांदे यांच्या लक्षात आले. त्यांनी यासंदर्भात अधिक माहिती घेतल्यावर संबंधित ग्रुपवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातही काही पोस्ट असल्याचे दिसले. त्यामुळे गांगुर्डे यांनी याप्रकरणी सायबर पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली. याप्रकरणी सायबर पोलिसांनी फेसबुककडे ग्रुपसंदर्भात माहिती मागवली आहे. त्यानंतर संशयितांवर पुढील कारवाई होणार असल्याचे सायबरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांनी सांगितले. दरम्यान, गत आठवड्यात शहरात भिंतीवरील जाहिरातीत छेडछाड करीत त्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली होती. याप्रकरणीही भाजप पदाधिकाऱ्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांविरोधात इंदिरानगर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.
आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे. सोशल मीडियावरही राजकीय पदाधिकारी, समर्थकांकडून आरोप प्रत्यारोप, प्रचार होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी सोशल मीडियावरही लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा :

Srinivas Pawar On Ajit Pawar | सूज्ञ बारामतीकरांचे मत…; श्रीनिवास पवार यांच्या टीकेला अजित पवार गटाकडून उत्तर
ब्रेंकिंग : ‘सीएए’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नाेटीस, ८ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश
Vedaa Teaser : ‘सिर्फ जंग लडनी आती है’, ॲक्शनने भरपूर जॉन अब्राहमचा ‘वेदा’ चित्रपट

Latest Marathi News ‘बीजेपी महाराष्ट्र’ नावाने फेसबुकवर ग्रुप बनवून आक्षेपार्ह पोस्ट Brought to You By : Bharat Live News Media.