बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण यांना सुप्रीम कोर्टात हजर राहण्याचे आदेश, प्रकरण काय?

पुढारी ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयाने आयुर्वेदिक कंपनी पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण आणि योगगुरू बाबा रामदेव यांना अवमान नोटीसला उत्तर न दिल्याने पुढील सुनावणीच्या तारखेला हजर राहण्यास सांगितले आहे. पतंजली आयुर्वेदने औषधी उपचारांबद्दल दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित करणे सुरू ठेवल्याने न्यायालयाने यापूर्वी अवमान नोटीस जारी केली होती. पतंजली आयुर्वेदच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरून बाबा रामदेव … The post बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण यांना सुप्रीम कोर्टात हजर राहण्याचे आदेश, प्रकरण काय? appeared first on पुढारी.

बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण यांना सुप्रीम कोर्टात हजर राहण्याचे आदेश, प्रकरण काय?

Bharat Live News Media ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयाने आयुर्वेदिक कंपनी पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण आणि योगगुरू बाबा रामदेव यांना अवमान नोटीसला उत्तर न दिल्याने पुढील सुनावणीच्या तारखेला हजर राहण्यास सांगितले आहे. पतंजली आयुर्वेदने औषधी उपचारांबद्दल दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित करणे सुरू ठेवल्याने न्यायालयाने यापूर्वी अवमान नोटीस जारी केली होती.
पतंजली आयुर्वेदच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरून बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्याविरुद्ध अवमानना कारवाईत कारणे दाखवा नोटीसला उत्तर न दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दोघांना वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
२७ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल पतंजली आयुर्वेदवर टीका केली होती. न्यायालयाने कंपनीला रोग उपचार म्हणून उत्पादनांची जाहिरात करण्यापासून प्रतिबंधित केले होते. न्यायालयाने पतंजली आयुर्वेद आणि त्यांचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांना नोटीस बजावून न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल संभाव्य अवमानना कारवाईचा इशारा दिला होता.

Supreme Court asks Ayurvedic company Patanjali Ayurved Managing Director Acharya Balkrishna and Yog Guru Ramdev to appear before it on the next date of hearing for not responding to the contempt notice. pic.twitter.com/LNyvgNlx4I
— ANI (@ANI) March 19, 2024

The post बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण यांना सुप्रीम कोर्टात हजर राहण्याचे आदेश, प्रकरण काय? appeared first on Bharat Live News Media.

Go to Source