: सिसोदियांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत ६ एप्रिलपर्यंत वाढ
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी आज दिल्लीत राऊस एव्हेन्यू न्यायालयाने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत ६ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.
काय आहे प्रकरण ?
दिल्ली सरकारने 2021-22 च्या उत्पादन शुल्क धोरणांतर्गत ज्या दारू (मद्य) व्यापाऱ्यांना परवाने दिले होते, त्यांनी त्यासाठी लाच दिली होती. परवानेही आम आदमी पार्टीच्या मर्जीतील मद्य व्यापाऱ्यांनाच दिले गेले होते, असा आरोप आहे. आम आदमी पक्षाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी अनियमिततेमुळे मद्य धोरण रद्द केले होते आणि सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. कथित मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीनेही गुन्हा दाखल केला होता.
#WATCH | AAP leader & former Delhi Dy CM Manish Sisodia leaves from Delhi’s Rouse Avenue Court for a hearing in the Delhi Excise Policy Case.
Delhi’s Rouse Avenue court extended the judicial custody of Manish Sisodia till April 6, the next date of hearing. pic.twitter.com/Nf51Plm8uC
— ANI (@ANI) March 19, 2024
The post : सिसोदियांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत ६ एप्रिलपर्यंत वाढ appeared first on Bharat Live News Media.