Pune Crime News : मित्राची मोटारसायकल वापरणं बेतलं जीवावर…
पुणे : पुढारी वृत्तसेवा : मामाच्या घरी जेवणाचा डबा आणण्यासाठी तो मित्राची मोटारसायकल घेऊन गेला होता. मात्र, मोटार सायकलवाल्या मित्राचा काही जणांसोबत वाद झाला होता. दरम्यान, या मोटारसायकलमुळे दुपारच्या भांडणातील तो असावा, या संशयावरून दोघांनी कोयत्याने वार करून एका 17 वर्षांच्या युवकाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ओंकार विजय गायकवाड (वय 17, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत त्याने मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी योगेश डिरे आणि रज्जत चौधरी (दोघे रा. केशवनगर, मुंढवा) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. योगेश डिरे हा रेकॉर्डवरील गुंड आहे. हा प्रकार केशवनगरमधील रेणुकामाता मंदिरासमोर सोमवारी रात्री दहा वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार गायकवाड व त्याचा मित्र नीलेश असे फिर्यादीच्या मामाच्या घरी जेवणाचा डबा आणण्यासाठी जात होते.
त्यांनी इमाम शेख या मित्राकडे त्याची दुचाकी मागितली. तेव्हा इमाम शेख याने माझी केशवनगर येथील योगेश डिरे याच्यासोबत दुपारी भांडणे झाली आहेत. तू गाडी घेऊन गेला तर तो माझी गाडी ओळखून तुझ्याशी भांडणे करेल, असे सांगितले. त्याकडे दुर्लक्ष करून ओंकार हा त्याची दुचाकी घेऊन केशवनगरला गेला. तेव्हा योगेश डिरे व रज्जत चौधरी यांनी त्यांना अडविले. ’दुपारच्या भांडणात तू होता ना तुला लय मस्ती आली होती ना, तुझी विकेटच टाकतो’, असे म्हणून कमरेचा कोयता काढून फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. कोयत्याने व दगडाने मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक करपे तपास करीत आहेत.
हेही वाचा
Pune : वाडा पुनर्वसन गावाच्या रस्त्याची दुरवस्था
आंबेगावच्या पूर्व भागातील पिके सुके लागली
कोयता घेऊन झाडे कापायला निघाले अन् घडले भलतेच…
The post Pune Crime News : मित्राची मोटारसायकल वापरणं बेतलं जीवावर… appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : मामाच्या घरी जेवणाचा डबा आणण्यासाठी तो मित्राची मोटारसायकल घेऊन गेला होता. मात्र, मोटार सायकलवाल्या मित्राचा काही जणांसोबत वाद झाला होता. दरम्यान, या मोटारसायकलमुळे दुपारच्या भांडणातील तो असावा, या संशयावरून दोघांनी कोयत्याने वार करून एका 17 वर्षांच्या युवकाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ओंकार विजय गायकवाड (वय 17, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) …
The post Pune Crime News : मित्राची मोटारसायकल वापरणं बेतलं जीवावर… appeared first on पुढारी.