कोयता घेऊन झाडे कापायला निघाले अन् घडले भलतेच…
पुणे : पुढारी वृत्तसेवा : पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातील सीसीटीव्ही कॅमेर्यांनी दुचाकीवरून कोयता घेऊन निघालेल्यांना टिपले. याची माहिती तत्काळ अलंकार पोलिसांना देण्यात आली. प्रर्श्न कोयत्याच्या धाकाचा अन् दहशतीचा असल्यामुळे पोलिसांनी तपास करून दुचाकीस्वारासह साथीदारांना पकडले. दोघांची चौकशी करण्यात आली. तेव्हा दोघे जण एरंडवणे भागात महापालिकेचे सफाई कामगार असल्याचे पुढे आले.
दोघे जण झाडे कापण्यासाठी कोयता घेऊन निघाल्याची माहिती चौकशीत मिळाल्याने पोलिसांनीही सुटकेचा निश्वास सोडला, तसेच यामुळे त्यांची सतर्कताही दिसून आली. त्याचं झालं असं, कोथरूड भागातील डहाणूकर कॉलनी परिसरात रामदासजी कळसकर पथ नामफलकासमोर एक लहान झाड वाढल्याने फलकावरील नाव झाकले गेले होते. तेथे वाढलेली झाडी, झुडपे कापून सफाई करावी, अशी तक्रार नागरिकांनी कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयात नोंदविली. त्यानंतर क्षेत्रीय कार्यालयातील दोन सफाई कामगारांनी आरोग्य कोठीतून कोयते घेतले. दुचाकीवरून दोघे जण डहाणूकर कॉलनीकडे निघाले.
सफाई कामगारांनी कोयत्याने झाड तोडले. तेथून ते पुन्हा क्षेत्रीय कार्यालायाकडे निघाले. दुचाकीवरील सहप्रवासी सफाई कामगाराने हातात कोयता धरला होता. दुचाकीवरून निघालेल्या एकाच्या हातात कोयता असल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्यांनी टिपले. पोलीस आयुक्त कार्यालयातील नियंत्रण कक्षातील अधिकार्यांनी हे पाहिले. संबंधित चित्रीकरण त्वरित अलंकार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे यांना पाठविण्यात आले आणि कोयता बाळगणार्यांना पकडा, असे सांगण्यात आले.
त्यानंतर पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, आशिष राठोड, पोलीस कर्मचारी निशिकांत सावंत यांनी तपास सुरू केला होता. चौकशीदरम्यान दुचाकीवरून कोयता घेऊन जाणारे कोयता गँगमधील गुन्हेगार नसून, कोयता बाळगणारे सफाई कामगार असल्याचे समोर आले. त्या कामगारांना पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले. सफाई कामगार घाबरले होते.
कोयते, कुर्हाडी झाकून न्या…
कोयते, कुर्हाडींचा वापर गवत आणि फांद्या कापण्यासाठी केला जातो. उघड्यावर कोयते आणि कुर्हाडी घेऊन फिरू नका. महापालिकेने कोयते आणि कुर्हाडींची नोंद ठेवावी. कोयते, कुर्हाडी झाकून नेल्यास नागरिकही भीतीपोटी तक्रार देणार नाहीत, असे पोलीस निरीक्षक राजेश तटकरे यांनी सांगितले. कामाची नोंद, तसेच छायाचित्रे काढून ठेवावीत, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा
आंबेगावच्या पूर्व भागातील पिके सुके लागली
Pune : हवेलीतील 11 गावांत सापडल्या 3,488 कुणबी नोंदी
वायूप्रदूषणाचे दुष्परिणाम ; ज्येष्ठांसह लहान मुले, महिलाही बेजार
The post कोयता घेऊन झाडे कापायला निघाले अन् घडले भलतेच… appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातील सीसीटीव्ही कॅमेर्यांनी दुचाकीवरून कोयता घेऊन निघालेल्यांना टिपले. याची माहिती तत्काळ अलंकार पोलिसांना देण्यात आली. प्रर्श्न कोयत्याच्या धाकाचा अन् दहशतीचा असल्यामुळे पोलिसांनी तपास करून दुचाकीस्वारासह साथीदारांना पकडले. दोघांची चौकशी करण्यात आली. तेव्हा दोघे जण एरंडवणे भागात महापालिकेचे सफाई कामगार असल्याचे पुढे आले. दोघे जण झाडे कापण्यासाठी कोयता …
The post कोयता घेऊन झाडे कापायला निघाले अन् घडले भलतेच… appeared first on पुढारी.