अमृता खानविलकरची लहान बहिणही आहे तिच्यासारखीच सुंदर
पुढारी ऑनलाईन डेस्क : अमृता खानविलकरचा आज २३ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. तुम्हाला माहितीयेका तिच्या लहान बहिणीबद्दल, जी अमृतासारखीच दिसायला खूप सुंदर आहे. अमृताच्या लहान बहिणीचे नाव अदिती खानविलकर (HBD Amruta Khanvilkar ) बक्षी असे आहे. ती विवाहित आहे. अमृता आणि अदितीचे फोटोज अमृताच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर पाहायला मिळतात. (HBD Amruta Khanvilkar)
संबंधित बातम्या –
Sam Bahadur: ‘सॅम बहादूर’मधील नवे गाणे ‘बंदा’ रिलीज (Video)
Bigg Boss 17 : बिग बॉस 17 मध्ये विकी जैन पुन्हा लाईमलाईटमध्ये, अंकितावरील प्रेम आलं समोर
HBD Kartik Aryan : कार्तिकवर तरुणी का होतात फिदा? संपत्ती पाहाल तर…
View this post on Instagram
A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)
अमृताची बहिण अदिती दुबईतराहते. ती एक एअर हॉस्टेस आहे. तिला एक मुलगादेखील आहे. अदिती आपल्या मुलासमवेतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियावर अमृताने बहिणीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. दोघींचेही लहानपणीचे फोटोदेखील अमृताच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळतात.
View this post on Instagram
A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)
फिटनेससाठी ओळखली जाते अमृता
अमृताने वयाच्या २९ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. तरीही ती चाळीशीतूल वाटत नाही. ती आपल्या फिटनेससाठी ओळखली जाते. फिटनेसबाबत ती खूप जागरुक असल्याचे म्हटलं जातं. अमृताने योगाचंही प्रशिक्षण घेतलं आहे. ती जीममध्येही जाऊन मेहनत करताना दिसतेय. अमृता एक उत्तम डान्सरदेखील आहे.
View this post on Instagram
A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)
अमृताने केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तिने २००५ मध्ये टीव्ही मालिका टाईम बॉम्ब ९/११ मध्ये काम केलं होतं. अमृताने सतरंगी रे, आणि डॉ. काशीनाथ घणेकर, चोरीचा मामला, वेलकम जिंदगी, झकास, कट्यार काळजात घुसली या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. तर राजी सारख्या हिंदी चित्रपटामध्ये काम केलं आहे.
View this post on Instagram
A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)
The post अमृता खानविलकरची लहान बहिणही आहे तिच्यासारखीच सुंदर appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : अमृता खानविलकरचा आज २३ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. तुम्हाला माहितीयेका तिच्या लहान बहिणीबद्दल, जी अमृतासारखीच दिसायला खूप सुंदर आहे. अमृताच्या लहान बहिणीचे नाव अदिती खानविलकर (HBD Amruta Khanvilkar ) बक्षी असे आहे. ती विवाहित आहे. अमृता आणि अदितीचे फोटोज अमृताच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर पाहायला मिळतात. (HBD Amruta Khanvilkar) संबंधित बातम्या – …
The post अमृता खानविलकरची लहान बहिणही आहे तिच्यासारखीच सुंदर appeared first on पुढारी.