‘कोणाच्या जाण्याने कोणाचे अडत नसते…’; सोशल मिडियावरील ‘त्या’ फोटोची चर्चा

बारामती : पुढारी वृत्तसेवा; बारामती लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे. येथील राजकीय मैदान कमालीचे तापले असून, त्यात सोमवारी (दि. १८) भर पडली ती सोशल मिडियावर फिरणाऱ्या एका फोटोची. वटवृक्ष पालवी फोडत असतो, कोणाच्या जाण्याने कोणाचं अडत नसतं, असा मजकूर या फोटोवर टाकण्यात आला आहे. (Pawar Vs Pawar) बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार … The post ‘कोणाच्या जाण्याने कोणाचे अडत नसते…’; सोशल मिडियावरील ‘त्या’ फोटोची चर्चा appeared first on पुढारी.
‘कोणाच्या जाण्याने कोणाचे अडत नसते…’; सोशल मिडियावरील ‘त्या’ फोटोची चर्चा

बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा; बारामती लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे. येथील राजकीय मैदान कमालीचे तापले असून, त्यात सोमवारी (दि. १८) भर पडली ती सोशल मिडियावर फिरणाऱ्या एका फोटोची. वटवृक्ष पालवी फोडत असतो, कोणाच्या जाण्याने कोणाचं अडत नसतं, असा मजकूर या फोटोवर टाकण्यात आला आहे. (Pawar Vs Pawar)

बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशीच लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्पष्टीकरण एका पत्राद्वारे दिले होते. त्याला एक बारामतीकर या नावे निनावी पत्राद्वारे उत्तर देण्यात आले होते. (Pawar Vs Pawar)

आता खुद्द अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास व भावजय शर्मिला यांनी शरद पवार यांच्या मागे उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यात या फोटोची भर पडली आहे. सोमवारी बारामतीत श्रीनिवास पवार यांच्या भाषणाची आणि या फोटोचीच चर्चा रंगली. या फोटोत शरद पवार यांच्यापासून ते त्यांच्या बाजूने कुटुंबातील उभे राहिलेल्यांचा उल्लेख आहे. (Pawar Vs Pawar)

या निमित्ताने सोशल मिडियावर दोन्ही गटाचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले आहेत. एकमेकांचे उणेदुणे काढणाऱ्या पोस्टचा, एखाद्याने एखादी पोस्ट केली तर त्यावर काॅमेंटचा अक्षरक्ष पाऊस पडतो आहे. विशेषतः तरुण पिढी, नव मतदार यात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. कुटुंबात एकटे पडणार असल्याचे अजित पवार यापूर्वीच म्हणाले होते. त्याचा प्रत्यय आता येवू लागला आहे.

हे ही वाचा:

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना घरफोडीचे लायसन्स द्या: उद्धव ठाकरेंचा पलटवार
Lok Sabha Election Maharashtra: ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनाे, हे शब्‍द कुठे गेले?’ : मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
Lok Sabha Election 2024: एका मताने काय होणार? | ‘या’ दोन उमेदवारांची राजकीय गाडी घसरली होती एका मताने

Latest Marathi News ‘कोणाच्या जाण्याने कोणाचे अडत नसते…’; सोशल मिडियावरील ‘त्या’ फोटोची चर्चा Brought to You By : Bharat Live News Media.