नारायण मूर्तींकडून ४ महिन्यांच्या नातवाला २४० कोटींचे ‘गिफ्ट’

पुढारी ऑनलाईन डेस्क : इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी कंपनीतील त्यांच्या हिश्शातील ०.०४ टक्के शेअर्स त्यांचा चार महिन्यांचा नातू एकग्रह रोहन मूर्ती याच्या नावे केले आहेत. बाजारातील या शेअर्सची एकत्रित किंमत २४० कोटी इतकी आहे. नारायण मूर्ती यांचे वय ७७ आहे आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी हे शेअर्स नातवाच्या नावे केले आहेत. (Narayana Murthy … The post नारायण मूर्तींकडून ४ महिन्यांच्या नातवाला २४० कोटींचे ‘गिफ्ट’ appeared first on पुढारी.
नारायण मूर्तींकडून ४ महिन्यांच्या नातवाला २४० कोटींचे ‘गिफ्ट’


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी कंपनीतील त्यांच्या हिश्शातील ०.०४ टक्के शेअर्स त्यांचा चार महिन्यांचा नातू एकग्रह रोहन मूर्ती याच्या नावे केले आहेत. बाजारातील या शेअर्सची एकत्रित किंमत २४० कोटी इतकी आहे.
नारायण मूर्ती यांचे वय ७७ आहे आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी हे शेअर्स नातवाच्या नावे केले आहेत. (Narayana Murthy gift to grandson)
इन्फोसिसच्या एका शेअर्सची बाजारातील किंमत १६०२.३० रुपये इतकी आहे. हा जर हिशोब केला तर एकग्रह आताच कोट्यधीश झालेला आहे. एकग्रह हा नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचा मुलगा रोहन मूर्ती आणि अपर्णा कृष्णन यांचा मुलगा आहे. एकग्रहचा जन्म १० नोव्हेंबर २०२३ला बंगळूरूत झाला आहे.  (Narayana Murthy gift to grandson)
नारायण मूर्ती यांची कन्या अक्षता या ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी आहेत. अक्षता यांच्या नावे इन्फोसिसचे १.०५ टक्के शेअर्स आहेत. तर रोहन यांच्याकडे १.६४ टक्के शेअर्स आहेत. तर सुधा मूर्ती यांच्याकडे इन्फोसिसचे ०.९३ टक्के इतके शेअर्स आहेत. नारायण मूर्ती आणि सहा जणांनी मिळून १९८१ला इन्फोसिसीची स्थापना केली होती.
हेही वाचा

मराठी भाषा आई तर कन्नड भाषा मावशी : डॉ. सुधा मूर्ती

कोल्हापूरची कन्या सुधा मूर्ती राज्यसभेवर

अझीम प्रेमजींनी नाकारला होता चक्क नारायण मूर्तीचा नोकरीचा अर्ज..

The post नारायण मूर्तींकडून ४ महिन्यांच्या नातवाला २४० कोटींचे ‘गिफ्ट’ appeared first on Bharat Live News Media.

Go to Source