राहुल गांधींचा ‘शक्ती’ टिप्पणीवर खुलासा, “PM मोदींकडून माझ्‍या ..”

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेसच्‍या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपा निमित्त इंडिया आघाडीने रविवार,१७ मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर शक्‍तीप्रदर्शन केले. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करताना शक्ती’ शब्‍दावर टिप्‍पणी केली हाेती. यानंतर आज भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौफर टीका केली. आता राहुल गांधींनी आपल्‍या टिप्पणीवर खुलासा केला आहे. ते नेहमी … The post राहुल गांधींचा ‘शक्ती’ टिप्पणीवर खुलासा, “PM मोदींकडून माझ्‍या ..” appeared first on पुढारी.
राहुल गांधींचा ‘शक्ती’ टिप्पणीवर खुलासा, “PM मोदींकडून माझ्‍या ..”

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेसच्‍या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपा निमित्त इंडिया आघाडीने रविवार,१७ मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर शक्‍तीप्रदर्शन केले. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करताना शक्ती’ शब्‍दावर टिप्‍पणी केली हाेती. यानंतर आज भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौफर टीका केली. आता राहुल गांधींनी आपल्‍या टिप्पणीवर खुलासा केला आहे.
ते नेहमी माझ्‍या शब्‍दांचा अर्थ बदलण्‍याचा प्रयत्‍न करतात
राहुल गांधी यांनी म्‍हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याकडून मी केलेल्‍या ‘शक्ती’ टिप्पणीचा विपर्यास करण्‍यात येत आहे. मला माहित आहे की मी खरे बोलतो आहे. मोदीजींना माझे शब्द आवडत नाहीत. ते नेहमी कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्यांचा अर्थ बदलण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना माहित आहे की मी सत्य बोललो आहे. मी ज्या ‘शक्ती’चा उल्लेख केला आहे आणि ज्यांच्या विरोधात आम्ही लढत आहोत ती आहे. त्याचा मुखवटा दुसरा कोणी नसून मोदीजी आहे,” असे राहुल गांधीही राहुल गांधी यांनी आपल्‍या X वरील पोस्‍टमध्‍ये म्‍हटले आहे.

मोदी जी को मेरी बातें अच्छी नहीं लगतीं, किसी न किसी तरह उन्हें घुमाकर वह उनका अर्थ हमेशा बदलने की कोशिश करते हैं क्योंकि वह जानते हैं कि मैंने एक गहरी सच्चाई बोली है।
जिस शक्ति का मैंने उल्लेख किया, जिस शक्ति से हम लड़ रहे हैं, उस शक्ति का मुखौटा मोदी जी हैं।
वह एक ऐसी शक्ति…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 18, 2024

शक्ती’ नष्ट करू इच्छिणारे आणि ‘शक्ती’ची पूजा करणाऱ्यांमध्ये खरी लढाई : मोदी
राहुल गांधी यांच्‍या ‘शक्ती’ टिप्पणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील जगतियाल येथील जाहीर सभेत प्रत्‍युत्तर दिले होते. ते म्‍हणाले होते की, “कोणी ‘शक्ती’च्या नाशाबद्दल बोलू शकते का?. चंद्रयान ज्या बिंदूवर उतरले त्याला ‘शिवशक्ती’ असे नाव देऊन आम्ही चांद्रयान मोहिमेचे यश समर्पित केले. ‘शक्ती’ नष्ट करू इच्छिणाऱ्या आणि ‘शक्ती’ची पूजा करणाऱ्यांमध्ये आता खरी लढाई आहे. या सामन्‍याचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.”
“…हा तर हिंदूंच्‍या श्रद्धेचा अपमान” : भाजपचा हल्लाबोल
राहुल गांधी यांच्‍या आरोपला प्रत्‍युत्तर देताना सोशल मीडियावर शेअर केलेल्‍या व्‍हिडिओमध्‍ये भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला म्हणाले होते की, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे वक्तव्य हिंदूंच्‍या श्रद्धेचा अपमान आहे. हिंदू धर्मात शक्ती नावाची गोष्ट आहे. राहुल गांधी म्‍हणतात आम्ही शक्तीशी लढतोय. हा केवळ हिंदू धर्माचा अपमान नाही तर नारी शक्ती आणि त्याच्या प्रकटीकरणाच्या विरोधात असलेल्या राहुल गांधींची कुरूप मानसिकता दर्शवते.
‘एखादी व्यक्ती दुसऱ्याचा द्वेष करते याला काही तरी मर्यादा असावी’
राहुल गांधींच्या “शक्ती” या शब्‍दांवर टीका करताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, “एखादी व्यक्ती दुसऱ्याचा द्वेष करते अशी काही तरी मर्यादा असावी. राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींबद्दल तीव्र द्वेष आणि त्यांच्या कौटुंबिक स्थितीचे अहंकारी प्रदर्शन सर्व मानवी मर्यादा ओलांडले आहे.” .
काय म्‍हणाले होते राहुल गांधी ?
मुंबईतील जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी म्‍हणाले की,. पंतप्रधान नरेंद्र मोदी “ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) शिवाय निवडणूक जिंकू शकत नाहीत. हिंदू धर्मात ‘शक्ती’ हा शब्द आहे. आपण एका शक्तीविरोधात लढत आहोत. प्रश्न असा आहे की, ही शक्ती काय आहे? राजाचा आत्मा ‘ईव्हीएम’मध्ये आहे. हे सत्य आहे. राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. आणि देशातील प्रत्येक संस्थेत ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभागात आहे. नुकतीच महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेस पक्ष सोडला. त्‍यापूर्वी ते नेते माझ्या आईसमोर रडत म्हणाले की, ‘सोनियाजी, मला लाज वाटते की, या शक्तीशी लढण्याची ताकद माझ्यात नाही. मला तुरुंगात जायचे नाही.’ अशा प्रकारे हजारो लोकांना धमकावण्यात आले आहे,” असा आरोपही यावेळी राहुल गांधी यांनी केला होता.
 
Latest Marathi News राहुल गांधींचा ‘शक्ती’ टिप्पणीवर खुलासा, “PM मोदींकडून माझ्‍या ..” Brought to You By : Bharat Live News Media.