आंबेगावच्या पूर्व भागातील पिके सुके लागली

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  सध्या वातावरणात उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. यामुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात व शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेती पिके सुकत असून, त्यांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. यावर्षी पाऊस कमी असल्याने या परिसरातील जमिनीतील पाणीपातळी कमी झाली आहे. त्यामुळे हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण)च्या उजव्या कालव्याला पाणी सोडावे, अशी … The post आंबेगावच्या पूर्व भागातील पिके सुके लागली appeared first on पुढारी.
#image_title

आंबेगावच्या पूर्व भागातील पिके सुके लागली

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  सध्या वातावरणात उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. यामुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात व शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेती पिके सुकत असून, त्यांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. यावर्षी पाऊस कमी असल्याने या परिसरातील जमिनीतील पाणीपातळी कमी झाली आहे. त्यामुळे हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण)च्या उजव्या कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील याच्याकडे केली.
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. सरकारने अनेक तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केले आहेत.
संबंधित बातम्या :

ती मोठी माणसं, त्यांना डावपेच माहिती आहेत : जरांगे पाटील यांचा भुजबळांवर निशाणा
Nashik Onion Price : लासलगावी कांदा ४०० रुपयांनी घसरला
Punjab News : पंजाबमधील गुरूद्वारात निहंग शिख आणि पोलिसांत धुमश्चक्री; पोलिसाचा मृत्यू, ३ जखमी

आंबेगाव तालुक्यातही तिच परीस्थिती असून सध्या शेतात असलेल्या शेतीपिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. जमिनीची पाणीपातळी कमी असल्याने विहिरी, ओढ्या-नाल्यांना पाणी कमी आहे. यामुळे पिके सुकू लागली असून त्यांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. आंबेगावचा पूर्व भाग व शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागाला डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणीपुरवठा केला जातो. शेतामध्ये उभ्या असणार्‍या पिकांना सध्या पाण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणी सोडण्याची मागणी होत आहे. जलसंपदा विभागाच्या वतीने दि. 15 डिसेंबरनंतर आवर्तन सोडण्याचे नियोजन झाले आहे; परंतु नोव्हेंबर महिन्यातच शेती पिके सुकू लागल्याने हे आवर्तन लवकर सोडावे, अशी मागणी अनिल वाळुंज यांनी केली आहे.
The post आंबेगावच्या पूर्व भागातील पिके सुके लागली appeared first on पुढारी.

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  सध्या वातावरणात उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. यामुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात व शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेती पिके सुकत असून, त्यांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. यावर्षी पाऊस कमी असल्याने या परिसरातील जमिनीतील पाणीपातळी कमी झाली आहे. त्यामुळे हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण)च्या उजव्या कालव्याला पाणी सोडावे, अशी …

The post आंबेगावच्या पूर्व भागातील पिके सुके लागली appeared first on पुढारी.

Go to Source