निवृत्त कर्मचार्यांना रोजगार; तरुणाईला का नाही?
प्रसाद जगताप
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील तिकीट काढण्यासाठी असलेल्या एटीव्हीएम मशिनवर तरुणाईला रोजगार देण्याऐवजी रेल्वे प्रशासनाने त्यांच्याकडीलच निवृत्त कर्मचार्यांना रोजगार दिला आहे. त्यामुळे तरुणाईसह रेल्वे संघटनांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शहरात असंख्य मुले-मुली रोजगाराविना फिरत आहेत. अनेक जण रोजगार नसल्यामुळे आत्महत्या देखील करीत आहेत.
अशावेळी रेल्वे प्रशासनाकडून तरुणाईला येथील ’एटीव्हीएम’ मशिनवर रोजगार देण्याऐवजी त्यांच्याकडीलच निवृत्त कर्मचार्यांना पुन्हा कामावर ठेवले जात आहे. त्यामुळे अनेक तरुणांचा रोजगारच बुडत असल्याचे चित्र समोर आले आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने या एटीव्हीएम मशिनवर तरुणाईला प्रशिक्षण देऊन काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.
पुणे रेल्वे स्थानकावरील एटीव्हीएम मशिनची संख्या – 16
पुणे स्टेशनवर मशिनच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न – 17 लाख 50 हजार
मशिनद्वारे विक्री होणारी तिकीटसंख्या – 15 हजार 719
मशिनवरील कर्मचारी (पुणे रेल्वे स्थानक) – 32
मशिनवरील कर्मचारी (पुणे विभाग) – 67
चतुर्थ श्रेणीतील निवृत्त कर्मचारी करतात काम
पुणे रेल्वे स्थानकावर सप्टेंबर 2021 पासून एटीव्हीएम मशिनमार्फत प्रवाशांना तिकीट देण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. तेव्हापासून आतापर्यंत या एटीव्हीएम मशिनवर रेल्वेतून निवृत्त झालेले चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना तिकिटामागे कमिशन दिले जात आहे.
…तर देशात 10 हजार रोजगार मिळतील
पुणे रेल्वे विभागात 60 ते 70 निवृत्त कर्मचारी एटीव्हीएम मशिनवर तिकीट काढून देण्यासाठी कार्यरत आहेत. असे मशिन देशातील प्रत्येक स्थानकावर आहेत. त्या सर्व ठिकाणी रेल्वे प्रशासनाने कॉन्ट्रॅक्ट बेस पध्दतीने तरुणाईची भरती केली तर देशातील जवळपास 10 ते 15 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने या धोरणाबाबत फेरविचार करून निवृत्त कर्मचार्यांऐवजी तरुणाईला संधी द्यावी, अशी मागणी तरुणांकडून केली जात आहे.
रेल्वेमध्ये सततच भोंगळ कारभार सुरू असतो. 60 वर्षे झालेल्या रिटायर्ड कर्मचार्यांना पुन्हा कामावर घ्यायची काय गरज आहे. ते नियमातही बसत नाही. शहरात असंख्य मुले-मुली रोजगाराविना फिरत आहेत. त्यांना रोजगार देण्याऐवजी रिटायर्ड कर्मचार्यांना पुन्हा का घेतात? हे चुकीचे आहे. रेल्वेने तातडीने यात बदल करून तरुणाईला संधी द्यावी.
– हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप
रेल्वेच्या पॉलिसीनुसार एटीव्हीएम फॅसिलेटर म्हणून फक्त निवृत्त कर्मचार्यांची नेमणूक करणे बंधनकारक आहे. कॉन्ट्रॅक्ट किंवा कायम पध्दतीने यावर कोणाचीही नेमणूक करता येत नाही. आमच्याकडील वर्ग ’ड’मधील निवृत्त कर्मचारी सध्या या एटीव्हीएम मशिनवर कार्यरत आहेत.
– डॉ. रामदास भिसे (आयआरटीएस),
जनसंपर्क अधिकारी तथा विभागीय वाणिज्य
व्यवस्थापक, पुणे विभाग
हेही वाचा
Pune : हवेलीतील 11 गावांत सापडल्या 3,488 कुणबी नोंदी
वायूप्रदूषणाचे दुष्परिणाम ; ज्येष्ठांसह लहान मुले, महिलाही बेजार
ती मोठी माणसं, त्यांना डावपेच माहिती आहेत : जरांगे पाटील यांचा भुजबळांवर निशाणा
The post निवृत्त कर्मचार्यांना रोजगार; तरुणाईला का नाही? appeared first on पुढारी.
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील तिकीट काढण्यासाठी असलेल्या एटीव्हीएम मशिनवर तरुणाईला रोजगार देण्याऐवजी रेल्वे प्रशासनाने त्यांच्याकडीलच निवृत्त कर्मचार्यांना रोजगार दिला आहे. त्यामुळे तरुणाईसह रेल्वे संघटनांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शहरात असंख्य मुले-मुली रोजगाराविना फिरत आहेत. अनेक जण रोजगार नसल्यामुळे आत्महत्या देखील करीत आहेत. अशावेळी रेल्वे प्रशासनाकडून तरुणाईला येथील ’एटीव्हीएम’ मशिनवर रोजगार देण्याऐवजी त्यांच्याकडीलच निवृत्त कर्मचार्यांना पुन्हा …
The post निवृत्त कर्मचार्यांना रोजगार; तरुणाईला का नाही? appeared first on पुढारी.