Pune Crime News : टाकीत बुडवून घरमालकाचा खून
पुणे : पुढारी वृत्तसेवा : मोटारसायकल रेस करण्याच्या कारणातून झालेल्या वादात भाडेकरूने घरमालकाला मारहाण करून पाण्याच्या टाकीत बुडवून जिवे मारले. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. संतोष राजेंद्र धोत्रे (वय 37, रा. खंडोबा माळ, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
तर, दादा ज्ञानदेव घुले (वय 50, रा. खंडोबामाळ, उरुळी देवाची, ता. हवेली) असे खून झालेल्या घरमालकाचे नाव आहे. याबाबत प्रथमेश संतोष घुले (वय 19, रा. घुलेवस्ती, मांजरी) यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार खंडोबामाळ येथे घुले यांच्या घराच्या पार्किंगमधील पाण्याच्या टाकीत सोमवारी दुपारी दीड वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादा घुले हे घरमालक असून, फिर्यादी यांचे चुलते आहेत. संतोष धोत्रे हा घुले यांचा भाडेकरू आहे. दोघेही बांधकामावर मिस्त्री म्हणून काम करतात. सोमवारी दुपारी त्या दोघांनी दारू प्यायली होती. त्यानंतर संतोष धोत्रे हा झोपायला गेला. दादा घुले यांनी मोटारसायकल सुरू करून तिचा एक्सिलेटर वाढविला. मोटारसायकल रेस करून ठेवल्यामुळे धोत्रे याची झोपमोड झाल्याने त्यावरून त्यांच्यात वाद झाला.
तेव्हा संतोष धोत्रे याने दादा घुले यांना मारहाण करून पाण्याच्या टाकीत टाकले. त्यात दादा घुले यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून संतोष धोत्रे याला अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र खैरनार तपास करीत आहेत.
हेही वाचा
दुर्दैवी ! सळई डोक्यात पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू
Pune News : आता घ्या मनपसंत, नोकरी देणारे शिक्षण
हवा प्रदुषणाने वाढले सर्दी , खोकला, तापाचे रुग्ण
The post Pune Crime News : टाकीत बुडवून घरमालकाचा खून appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : मोटारसायकल रेस करण्याच्या कारणातून झालेल्या वादात भाडेकरूने घरमालकाला मारहाण करून पाण्याच्या टाकीत बुडवून जिवे मारले. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. संतोष राजेंद्र धोत्रे (वय 37, रा. खंडोबा माळ, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, दादा ज्ञानदेव घुले (वय 50, रा. …
The post Pune Crime News : टाकीत बुडवून घरमालकाचा खून appeared first on पुढारी.