मद्य धोरण घोटाळा प्रकरण; के. कविता यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने शुक्रवारी (दि.१५) हैदराबाद येथील के. कविता यांच्या घरी छापा टाकत, त्यानंतर त्यांना अटक केली. यानंतर त्यांना दिल्लीतील एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची ईडी कोठडी सुनावली. या विरोधात आव्हान देत भारत राष्ट्र समितीच्या (BRS) नेत्या के. कविता यांनी आता न्यायालयात याचिका दाखल करत, सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. (K. Kavita News)
भारत राष्ट्र समितीच्या नेत्या तेलंगणा विधान परिषदेच्या सदस्य के.कविता यांना दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात शनिवार २३ मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. अटकेप्रसंगी के कविता यांनी माझी अटक बेकायदेशीर असल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली होती. या कारवाईवर बीआरएस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, तीव्र आंदोलन केले होते. (K. Kavita News)
BRS MLC K Kavitha moves Supreme Court challenging her arrest in money laundering case relating to Delhi excise policy irregularities matter.
— ANI (@ANI) March 18, 2024
के. कविता यांच्यावर ‘हे’ आहेत आरोप?
के. कविता या तेलंगणातील विधान परिषदेच्या सदस्य आहेत. दिल्लीतील मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी अमित अरोरा याने चौकशीदरम्यान के. कविता यांचे नाव घेतले होते. त्यानंतर कविता ईडीच्या रडारवर आल्या. ईडीने आरोप केला आहे की ‘साउथ ग्रुप’ नावाच्या लिकर लॉबीनं आणखी एक आरोपी विजय नायर यांच्यामार्फत ‘आप’ नेत्यांना 100 कोटी रुपयांची लाच दिली होती. आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह हे दिल्ली मद्य धोरण प्रकरणी आधीच तुरुंगात आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही उत्पादन शुल्क धोरणाबाबत ईडी सातत्याने समन्स पाठवत आहे. मात्र, ईडीकडून समन्स आल्यानंतरही सीएम केजरीवाल एकदाही चौकशीसाठी गेलेले नाहीत. त्यांनी ईडीचे समन्स बनावट आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे. (K. Kavita News)
हे ही वाचा:
K Kavitha in Custody: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात के. कविता यांना ७ दिवस ईडी कोठडी
K Kavitha Arrested: ‘माझी अटक बेकायदेशीर’; के. कविता यांची ईडी अटकेवर प्रतिक्रिया
के. कविता यांना अटकेपासून दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
Latest Marathi News मद्य धोरण घोटाळा प्रकरण; के. कविता यांची सर्वोच्च न्यायालयात धाव Brought to You By : Bharat Live News Media.
