देशसेवेनंतर जनसेवेत अखंड सक्रिय, वृद्ध चिरमुरेवाले मेजर देताहेत माणुसकीचा संदेश

कोल्हापूर : सागर यादव,  भगवा फेटा, त्यावर मोरपीस, कपाळाला अष्टगंध, गुलाल, भंडार्‍यासह विविध रंगांचा गंध अशी वेशभुषा करून ‘हात भाजत्यात, चटकं बसत्यात, गरम शेंगदाणे, चिरमुरे’ अशी आरोळी देत सायकलवरून चिरमुरे-शेंगदाणे विक्रीचा व्यवसाय करणार्‍या त्या व्यक्तिमत्त्वाला अवघं कोल्हापूर चिरमुरेवाले मेजर म्हणून ओळखते. सैन्यदलाच्या माध्यमातून देशसेवा बजावल्यानंतर निवृत्तीनंतर जनजागृतीचे कार्य दत्तात्रय लक्ष्मण टोपले तथा चिरमुरेवाले मेजर करत … The post देशसेवेनंतर जनसेवेत अखंड सक्रिय, वृद्ध चिरमुरेवाले मेजर देताहेत माणुसकीचा संदेश appeared first on पुढारी.

देशसेवेनंतर जनसेवेत अखंड सक्रिय, वृद्ध चिरमुरेवाले मेजर देताहेत माणुसकीचा संदेश

कोल्हापूर : सागर यादव,  भगवा फेटा, त्यावर मोरपीस, कपाळाला अष्टगंध, गुलाल, भंडार्‍यासह विविध रंगांचा गंध अशी वेशभुषा करून ‘हात भाजत्यात, चटकं बसत्यात, गरम शेंगदाणे, चिरमुरे’ अशी आरोळी देत सायकलवरून चिरमुरे-शेंगदाणे विक्रीचा व्यवसाय करणार्‍या त्या व्यक्तिमत्त्वाला अवघं कोल्हापूर चिरमुरेवाले मेजर म्हणून ओळखते. सैन्यदलाच्या माध्यमातून देशसेवा बजावल्यानंतर निवृत्तीनंतर जनजागृतीचे कार्य दत्तात्रय लक्ष्मण टोपले तथा चिरमुरेवाले मेजर करत आहेत. (Kolhapur)

सदर बाजार येथे मुलासोबत राहणार्‍या टोपले यांना पेन्शन नसल्याने उदर निर्वाहासाठी ते चिरमुरे-शेंगदाणे विक्रीचा व्यवसाय करतात. पैसा अडक्या पेक्षा, माणुसकी जपा असा संदेश देत ते शहरभर फिरत असतात. विविध सण, उत्सव, राष्ट्रपुरुषांच्या जयंती उत्सवात त्यांचा सहभाग असतोच. टोपले यांचा जन्म 12 डिसेंबर 1953 चा. कुटुंबाला आधारासाठी त्यांनी 1965 पासून चिरमुरे विक्रीचा वडिलोपार्जित व्यवसाय सुरू केला. संधी मिळताच 1975 मराठा लाईट इन्फंट्री मध्ये शिपाई म्हणून ते रुजू झाले. 1980 हवालदार मेजर म्हणून बढती मिळविली. 9 वर्षे 13 दिवसांच्या लष्करी सेवेनंतर ते 1993 मध्ये निवृत्त झाले. निवृत्तीनंतर पूर्णवेळ पारंपरिक व्यवसाय सुरू केला. वयाच्या 72 व्या वर्षीही त्यांचे जनजागृतीचे व-त कायम आहे. हृदय शस्त्रक्रियेपाठोपाठ एका अपघातानंतर डाव्या बाजूचे दुखने सहन करत आपली सेवा ते बजावत आहेत.
Kolhapur : खिलाडूवृत्ती जोपासली
छत्रपती शाहू स्टेडियमवरील फुटबॉल मैदानात चिरमुरेवाले मेजर आवर्जुन उपस्थित असतात. खेळाडू किंवा प्रेक्षकाला इजा झाल्यास किंवा मुरगळ आल्यास ते तातडीने उपचार करतात. खिलाडूवृत्तीचा संदेश देत हुल्लडबाज समर्थकांत भांडणे-हाणामारी होऊ नये, यासाठी ते प्रयत्न करतात.
Latest Marathi News देशसेवेनंतर जनसेवेत अखंड सक्रिय, वृद्ध चिरमुरेवाले मेजर देताहेत माणुसकीचा संदेश Brought to You By : Bharat Live News Media.