विजयाचा उन्माद..! निवडणूक जिंकताच पुतिन यांनी दिली तिसर्या महायुद्धाची धमकी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : रशिया राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Russian Presidential Elections) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा जिंकली आहे. यामुळे सलग पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. विजयानंतर देशाला संबोधितांना पुतिन यांनी युरोपमधील देशांना धमकी देत तिसर्या महायुद्ध हाईल, अशी धमकी दिली आहे. त्याचबराेबर अमेरिकेच्या लोकशाहीचीही खिल्ली उडवली आहे.
रशिया राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे आज ( दि. १८ मार्च) निकाल जाहीर झाल्यानंतर आपल्या पहिल्या भाषणात व्लादिमीर पुतिन म्हणाले की, रशिया आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो युतीमध्ये संघर्ष झाला तर याचा अर्थ जग तिसऱ्या महायुद्धापासून फक्त एक पाऊल दूर असेल.
युक्रेनमध्ये अजूनही नाटोचे सैनिक
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भविष्यात युक्रेनमध्ये आपले सैन्य उतरवण्याची शक्यता नाकारली नाही, असे स्पष्ट केले होते. यावर पुतिन म्हणाले की, ‘आजच्या आधुनिक युगात काहीही शक्य आहे; पण असे झाले तर तिसरे महायुद्ध दूर नाही. नाटोचे सैन्य अजूनही युक्रेनमध्ये आहेत. युक्रेनमध्ये इंग्लंड आणि फ्रान्सचे सैनिक रणांगणावर असल्याची माहिती रशियाकडे आहे. त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट नाही, असा इशारा देत तिसरे महायुद्ध दूर नाही, अशी धमकी त्यांनी दिली.
रशिया चर्चेसाठी तयार आहे
युक्रेन युद्धावर पुतिन म्हणाले की, “फ्रान्स चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो कारण सर्व काही अद्याप संपलेले नाही. मी यापूर्वीही स्पष्ट केले आहे. आता पुन्हा सांगतो आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. मात्र केवळ शत्रूंचा दारूगोळा संपल्यामुळे चर्चा होणार नाहीत, असे नको चर्चा ही गाभीर्याने होणे आवश्यक आहे. शांतता हवी असेल तर त्यांना शेजारी देशांसारखे चांगले संबंध ठेवावे लागतील.”
ट्रम्प यांची भलामण आणि विरोधकाच्या मृत्यूवर शोक…
यावेळी पुतिन यांनी अमेरिकेच्या लोकशाहीची खिल्ली उडवली. ‘संपूर्ण जग अमेरिकेवर हसत आहे. तिथे काय चालले आहे. संपूर्ण राज्य यंत्रणा ट्रम्प यांच्या विरोधात तैनात आहे, असे सांगत अप्रत्यक्ष त्यांनी ट्रम्प यांची भलामणही पुतिन यांनी केली. तसेच आपले विरोधक ॲलेक्सी नवलनी यांच्या निधनावरही त्यांनी शोक व्यक्त केला. नवाल्नी यांचा नुकताच रशियन तुरुंगात संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. नवलनी पुतिन यांचे विरोधक मानले जात होते. नवलनी यांच्या मृत्यूचा आरोप पुतिन यांच्यावर होता.
२००० मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत व्लादिमीर पुतिन हे पहिल्यांदा रशियाचे अध्यक्ष झाले. यानंतर २००४, २०१२ आणि २०१८ मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकांमध्ये सत्ता अबाधित ठेवण्यात त्यांना यश आले होते. आता पुन्हा एकदा रशियातील सत्तेची सूत्रे पुढील सहा वर्षांसाठी आपल्याकडे ठेवण्यात पुतिन यशस्वी झाले आहेत.
हेही वाचा :
रशिया राष्ट्राध्यक्ष निवडणूक : मतदानाच्या अखेरच्या दिवशी युक्रेनकडून मोठा ड्रोन हल्ला
रशियात पुन्हा ‘पुतिन सरकार’? पुतिन यांनी केले ऑनलाईन मतदान
Latest Marathi News विजयाचा उन्माद..! निवडणूक जिंकताच पुतिन यांनी दिली तिसर्या महायुद्धाची धमकी Brought to You By : Bharat Live News Media.
