सिद्धू मुसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म

चंदीगड; वृत्तसंस्था : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची 58 वर्षीय आई चरणजित कौर यांनी रविवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बंठिडातील एक खासगी रुग्णालयात बाळाला (मुलगा) जन्म दिला. मुसेवाला याचे वडील बलकौर सिद्धू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देत बाळाचा फोटोही शेअर केला आहे.
वाहेगुरूच्या आशीवार्दाने सर्व काही शुभ घडले आहे. शुभचिंतकांचे मी आभार मानतो, असे बलकौर सिद्धू यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. आई होण्यासाठी चरणजित कौर यांनी आयव्हीएफ तंत्राची मदत घेतली आहे.
Latest Marathi News सिद्धू मुसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म Brought to You By : Bharat Live News Media.
