आचारसंहितेचे काटेकोर पालन करा : जिल्हाधिकारी येडगे

कोल्हापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : आचारसंहिता भंग होणार नाही याची काळजी घ्या. आचारसंहितेचे काटेकोर पालन करा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जिल्ह्यातील राजकीय पक्षांची रविवारी त्यांनी बैठक घेतली.जिल्हाधिकारी येडगे यांनी आयोगाच्या निवडणूक प्रक्रियेतील विविध सूचना राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दिल्या. ते म्हणाले, आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रत्येक सार्वजनिक, राजकीय कार्यक्रम आता निवडणूक प्रशासनाकडून बारकाईने तपासला जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना प्रलोभन दाखवू नये. (Kolhapur)
उमेदवारांचे अर्ज 12 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत स्वीकारले जाणार आहेत. दि. 13, 14 व 17 एप्रिल रोजी शासकीय सुट्टी असल्याने यावेळी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवाराने अर्ज दाखल केल्यानंतर खर्चाचा हिशेब दररोज द्यावा लागेल. उमेदवार निवडून आल्यानंतर सर्व हिशेब 30 दिवसांच्या आत सादर करावा लागेल. राजकीय कार्यक्रमांच्या व इतर आवश्यक परवानग्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शिवाजी सभागृहात एक खिडकी योजना सुरू केली आहे. सर्व आवश्यक परवानग्या घेऊनच कार्यक्रम करावेत अशा सूचनाही येडगे यांनी दिल्या. या बैठकीत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आपल्या समस्यांचे निराकारण करून घेतले.बैठकीला हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, निवडणूक उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Kolhapur : दैनंदिन स्वरूपात खर्च सादर करणे बंधनकारक
उमेदवारांनी तयार केलेल्या निवडणूक प्रचारासंबंधी सर्व छापील साहित्यावर प्रिंटर्सचा तपशील, संख्या व त्याचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. होर्डिंगवर मंजुरी आदेश क्रमांक टाकावा लागेल. इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरील जाहिरात माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून मंजूर करून प्रसिद्ध करावी लागेल. या सर्व प्रकारांतील खर्च दैनंदिन स्वरूपात सादर करणे बंधनकारक आहे. या व्यतिरिक्त राजकीय पक्षांना लहान मुले प्रचारासाठी वापरता येणार नाहीत. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनाही राजकीय कार्यात सहभागी करून घेता येणार नाही.
Latest Marathi News आचारसंहितेचे काटेकोर पालन करा : जिल्हाधिकारी येडगे Brought to You By : Bharat Live News Media.
