मी निवडणूक न जिंकल्यास अमेरिकेत रक्तपात : ट्रम्प

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मला निवडून न दिल्यास देशात रक्तपात होईल, असे खळबळजनक वक्तव्य माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ओहोओ राज्यात आयोजित केलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या एका निवडणूक रॅलीला ते संबोधित करत होते.
ट्रम्प म्हणाले की, 5 नोव्हेंबर ही तारीख लक्षात ठेवा. अमेरिकेच्या इतिहासातील ही एक महत्त्वाची तारीख असल्याचे मला वाटते. 2020 मधील राष्ट्राध्यक्ष निवडणूक निकाल ज्यांना मान्य नाही त्यांचे मी कौतुक करतो आणि त्यानंतर त्यांनी 6 जानेवारी 2021 मध्ये अमेरिकेच्या संसदेवर हल्लाबोल केला होता. अन्य देशांतून अमेरिकेत येणारे शरणार्थी हे माणूस नसून जनावरे आहेत. जो बायडेन आतापर्यंत सर्वात वाईट राष्ट्राध्यक्ष, तर आहेतच शिवाय ते मूर्खही आहेत.
Latest Marathi News मी निवडणूक न जिंकल्यास अमेरिकेत रक्तपात : ट्रम्प Brought to You By : Bharat Live News Media.
