एका क्लिकसरशी कळणार उमेदवारांची गुन्हेगारी, मालमत्ता

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर लगोलग निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नो युवर कँडिडेट (केवायसी) अॅपही लाँच केले. या अॅपच्या माध्यमातून मतदारांना त्यांच्या क्षेत्रातील लोकसभेच्या जागेवर निवडणूक लढवणार्या उमेदवारांच्या गुन्हेगारी रेकॉर्डची तसेच संपत्तीची माहिती उपलब्ध होऊ शकेल, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.
केवायसी-ईसीआय टाईप करून हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर डाऊनलोड केले जाऊ शकते. गुगल प्ले स्टोअरवर आतापर्यंत एक लाखावर लोकांनी ते डाऊनलोड केले आहे. त्याचा आकार 5.91 एमबी आहे. हे अॅप 29 फेब्रुवारी रोजी अखेरचे अपडेट करण्यात आले होते.
Latest Marathi News एका क्लिकसरशी कळणार उमेदवारांची गुन्हेगारी, मालमत्ता Brought to You By : Bharat Live News Media.
