नर्सिंग प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ!

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलतर्फे नर्सिंगच्या प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख पुन्हा एकदा 31 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. ज्यांना नर्सिंगला प्रवेश घ्यायचा आहे आणि ज्या उमेदवारांनी त्यासाठी आवश्यक असणार्या प्रवेश परीक्षेसाठी अद्याप अर्ज भरला नाही, त्यांना अर्ज करण्याची आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.
नर्सिंगच्या प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करण्यास येत्या 29 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, काही विद्यार्थी आणि पालकांकडून मुदतवाढीबाबत सीईटी सेलला पत्र प्राप्त झाले. त्यात विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन नोंदणीची तारीख वाढविण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार राज्य सीईटी सेलने एमएच-नर्सिंग सीईटी-2024 च्या ऑनलाइन नोंदणीची तारीख 31 मार्चपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
ही तिसरी आणि शेवटची मुदतवाढ असल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले आहे. यानंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ होणार नाही, त्यामुळे इच्छुक उमेदवारांसाठी नोंदणी करण्याची ही शेवटची संधी असणार आहे. इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र) वगळता राज्यातील एखाद्या संस्थेतून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या परीक्षेस बसण्यास पात्र आहेत. नर्सिंग प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी 9 ते 29 फेब्रुवारी पहिला टप्पा आणि 1 ते 15 मार्च दुसरा टप्पा पार पडला आहे. तर, आता 16 मार्च ते 31 मार्च यादरम्यान तिसरा टप्पा पार पडत आहे. त्यामुळे अद्यापही अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना संधी निर्माण झाली आहे.
कसा भराल अर्ज?
प्रथम सीईटी सेलच्या अधिकृत वेबसाईटmahacet.org ला भेट द्या. मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या नर्सिंग सीईटी 2024 नोंदणी लिंकवर क्लिक करा. नवीन पृष्ठावर स्वतःची नोंदणी करा आणि लॉगिन करा. अर्ज भरा आणि अर्ज फी जमा करा. अर्ज सबमिट करा आणि अर्जाची प्रिंटआऊट घ्या.
हेही वाचा
उमेदवार निवडीचे काँग्रेसपुढे आव्हान
कोल्हापूर : मुख्याध्यापक संघाची रणधुमाळी सुरू
Electoral Bond : इलेक्टोरल बाँडस्चे नवे तपशील निवडणूक आयोगाकडून जाहीर
Latest Marathi News नर्सिंग प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ! Brought to You By : Bharat Live News Media.
