कोल्हापूर : मुख्याध्यापक संघाची रणधुमाळी सुरू

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सोमवारी (दि. 18) प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. धर्मादाय सह-आयुक्त यांच्या आदेशाने 2023 ते 2026 या कालावधीकरिता जिल्हा मुख्याध्यापक संघ कार्यकारी मंडळाची निवडणूक घेण्यासाठी निरीक्षक म्हणून सत्यनारायण शेणॉय यांची नियुक्ती केली आहे. चेअरमन, व्हा. चेअरमन, … The post कोल्हापूर : मुख्याध्यापक संघाची रणधुमाळी सुरू appeared first on पुढारी.

कोल्हापूर : मुख्याध्यापक संघाची रणधुमाळी सुरू

कोल्हापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सोमवारी (दि. 18) प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
धर्मादाय सह-आयुक्त यांच्या आदेशाने 2023 ते 2026 या कालावधीकरिता जिल्हा मुख्याध्यापक संघ कार्यकारी मंडळाची निवडणूक घेण्यासाठी निरीक्षक म्हणून सत्यनारायण शेणॉय यांची नियुक्ती केली आहे. चेअरमन, व्हा. चेअरमन, जॉईंट सेक्रेटरी, खजानिस व 17 सदस्य असे मिळून 23 कार्यकारी मंडळ पदांसाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, मुख्याध्यापक संघ निवडणुकीच्या पार्श्वूमीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. यात शिक्षक आ. प्रा. जयंत आसगावकर विरुद्ध शिक्षक नेते यांच्या लढत होण्याची शक्यता आहे. यात डी. बी. पाटील विचारमंच, ‘कोजिमाशि’ मधील काहीजण असणार आहेत. काही ठिकाणी दुफळी निर्माण झाली आहे. यंदा मुख्याध्यापक संघाच्या निडणुकीत अटीतटीचे राजकारण पहायला मिळणार आहे.

Latest Marathi News कोल्हापूर : मुख्याध्यापक संघाची रणधुमाळी सुरू Brought to You By : Bharat Live News Media.