महत्वाची बातमी ! सीएच्या परीक्षा वेळापत्रकात मोठा बदल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने देशभरातील सार्वत्रिक निवडणुकांमुळे सीए इंटर, फायनल आणि फाउंडेशनच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. निवडणुकांमुळे परीक्षांच्या तारखांमध्ये बदल शक्य असल्याची माहिती आयसीएआयकडून यापूर्वीच देण्यात आली होती. त्यानुसार हे बदल करण्यात आले आहेत. परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आता परीक्षेचे नवीन वेळापत्रक 19 मार्च रोजी प्रसिद्ध होणार आहे. … The post महत्वाची बातमी ! सीएच्या परीक्षा वेळापत्रकात मोठा बदल appeared first on पुढारी.

महत्वाची बातमी ! सीएच्या परीक्षा वेळापत्रकात मोठा बदल

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने देशभरातील सार्वत्रिक निवडणुकांमुळे सीए इंटर, फायनल आणि फाउंडेशनच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. निवडणुकांमुळे परीक्षांच्या तारखांमध्ये बदल शक्य असल्याची माहिती आयसीएआयकडून यापूर्वीच देण्यात आली होती. त्यानुसार हे बदल करण्यात आले आहेत. परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आता परीक्षेचे नवीन वेळापत्रक 19 मार्च रोजी प्रसिद्ध होणार आहे. सीए इंटरमिजिएट ग्रुप 1 ची परीक्षा 3, 5 आणि 7 मे 2024 रोजी घेतली जाणार होती आणि गट 2 ची परीक्षा 9, 11 आणि 13 मे 2024 रोजी होणार होती.
सीए अंतिम गट 1 ची परीक्षा 2, 4 आणि 6 मे 2024 रोजी आणि गट 2 ची परीक्षा 8, 10 आणि 12 मे 2024 रोजी घेण्यात येणार होती.
या सर्वांशिवाय सीए फाउंडेशन परीक्षा 20, 22, 24 आणि 26 जून 2024 रोजी देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार होती, जी आता पुढे ढकलण्यात आली आहे. या सर्व परीक्षांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अर्जाची प्रक्रिया 23 फेब—ुवारी 2024 पर्यंत पूर्ण झाली. परीक्षा मे/ जूनमध्ये होणार होती, जी आता पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता सीएच्या सर्व परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा

हिंगोली : निष्ठूर काळजाच्या मुलाने आईला दगडाने ठेचून संपविले
Electoral Bond : इलेक्टोरल बाँडस्चे नवे तपशील निवडणूक आयोगाकडून जाहीर
Lok Sabha Election 2024 : मनुवादी शक्तींकडून लोकांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न : खर्गे

Latest Marathi News महत्वाची बातमी ! सीएच्या परीक्षा वेळापत्रकात मोठा बदल Brought to You By : Bharat Live News Media.