यवतमाळ : कुऱ्हाडीने वार करून वृद्धाची हत्या
यवतमाळ; Bharat Live News Media वृत्तसेवा : दारव्हा तालुक्यातीक लाडखेड परिसरातील दहिफळ येथे एका वृद्धाने नवीन कूलर घरी आणला. त्याच वेळी त्यांच्या घरात पाहुणे बसले होते. नवा कूलर आणल्याची माहिती मिळताच शेजारी राहणारा युवक कूलर पाहण्यासाठी आला. त्याला नंतर ये असे म्हणत बाहेर काढले. याचा राग धरून त्या युवकाने घरून कुऱ्हाड आणत वृद्धावर वार केला. ही घटना १३ मार्च रोजी बुधवारी दुपारी घडली. यात जखमी वृद्धाचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. यातील आरोपीला लाडखेड पोलिसांनी अटक केली आहे.
प्रकाश उद्धव इंदाने (वय ६०) रा. दहीफळ असे मृताचे नाव आहे. इंदाने यांनी बुधवारी नवा कूलर घरी आणला. दरम्यान, त्यांच्याकडे पाहुणेही आले. पाहुण्यांसोबत गप्पा गोष्टी सुरु असताना इंदाने यांच्या शेजारी राहणारा सचिन अंबादास कोसरे (वय ३५) हा नवा कूलर बधण्यासाठी आला. मात्र, इंदाने यांनी त्याला आता पाहुणे आहे तू. सार्यकाळी ये आणि कूलर पाहा, असे सांगितले. मात्र, यावरून सचिनने इंदाने यांच्यासोबत वाद घातला. शिवीगाळ केली व तेथून निघून गेला. नंतर तो काही वेळाने परत आला. त्याने सोबत आणलेल्या कुऱ्हाडीने प्रकाश इंदाने यांच्या डोक्यावर वार केला. यात इंदाने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे हलविण्यात आले. तेथून वर्धा येथील रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान इंदाने यांचा मृत्यू झाला.
Latest Marathi News यवतमाळ : कुऱ्हाडीने वार करून वृद्धाची हत्या Brought to You By : Bharat Live News Media.