यवतमाळ : वर्क फ्रॉम होमचे आमिष देऊन तरुणीला १२ लाखांना गंडा
यवतमाळ; Bharat Live News Media वृत्तसेवा : सध्या बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशांना वर्क फ्रॉम होमचे आमिष दिले जाते. घर बसल्या महिना इतके हजार कमवा अशी ऑफर देण्यात येते. याच ऑफरला बळी पडून महिलेने तिच्याजवळील १२ लाख ७५ हजार रुपये गमावले. ही घटना उघडकीस आल्यानंतर तिने लोहारा पोलिसात तक्रार दिली.
स्वाती प्रदीप पाटील यांना अज्ञात क्रमांकावरून फोन कॉल आला. संबंधिताने विविध गुगल अॅपला रिव्ह्यूव टास्क देण्याचे काम उपलब्ध असल्याचे सांगितले. एका दिवसात २० टास्क पूर्ण केल्यास प्रत्येक टास्कला दीडशे रुपये प्रमाणे मोबदला दिला जातो, असे सांगितले. हे पैसे जमा करण्यासाठी स्वाती पाटील यांच्याकडून संबंधिताने बैंक डिटेल्स मागवून घेतले. त्यानंतर त्याने परस्परच १२ लाख ७५ हजारांची रोख काढून घेतली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर स्वाती पाटील यांनी लोहारा पोलिस ठाण्यात धाव घेतली. यावरून पोलिसांनी कलम ४२० भादंविनुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
Latest Marathi News यवतमाळ : वर्क फ्रॉम होमचे आमिष देऊन तरुणीला १२ लाखांना गंडा Brought to You By : Bharat Live News Media.