सिंधुदुर्गात गोभी मंच्युरियनमध्ये फूड कलर न वापरण्याचा निर्धार!

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्हा गोभी मंच्युरियन विक्रेते संघटनेची बैठक रविवारी कुडाळ येथे पार पडली. या बैठकीत आरोग्यास अपायकारक असा कोणताही फूड कलर वापर करणार नसल्याचं निर्णय सिंधुपुत्र मंच्युरियन विक्रेते संघटनांनी घेतला आहे. नवनियुक्त अध्यक्ष वैभव घोगळे यांनी याबाबत माहिती दिली. सद्यस्थितीत गोभी मंच्युरियन मागणी वाढलेली असून त्याचा आबालवृद्ध आस्वाद घेत असतात. ग्राहकांच्या आरोग्याचा … The post सिंधुदुर्गात गोभी मंच्युरियनमध्ये फूड कलर न वापरण्याचा निर्धार! appeared first on पुढारी.

सिंधुदुर्गात गोभी मंच्युरियनमध्ये फूड कलर न वापरण्याचा निर्धार!

कुडाळ; Bharat Live News Media वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्हा गोभी मंच्युरियन विक्रेते संघटनेची बैठक रविवारी कुडाळ येथे पार पडली. या बैठकीत आरोग्यास अपायकारक असा कोणताही फूड कलर वापर करणार नसल्याचं निर्णय सिंधुपुत्र मंच्युरियन विक्रेते संघटनांनी घेतला आहे. नवनियुक्त अध्यक्ष वैभव घोगळे यांनी याबाबत माहिती दिली.
सद्यस्थितीत गोभी मंच्युरियन मागणी वाढलेली असून त्याचा आबालवृद्ध आस्वाद घेत असतात. ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करून आरोग्यास अपायकारक असा कोणताही फूड कलर वापर करणार नसल्याचं निर्णय एकमताने मंजूर करून त्यास पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आले असल्याचा निर्णय अध्यक्ष वैभव घोगळे यांनी जाहीर केला.
तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गोभी मंच्युरियन विक्रेते यांनी आपल्या व्यवसायाची नोंदणी करून संघटनेने जाहीर केलेल्या नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच फूड कलर वापर न करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आजपासूनच सुरू करण्यात आली आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कोणत्याही भागात गोभी मंच्युरियन मधे फूड कलर आढळुन आल्यास तत्काळ फोटो काढून संघटनेला व्हॉट्सप क्रमांक वर पाठवून तक्रार नोंद करावी, असे आवाहन संघटनेच्या वतीने अध्यक्ष वैभव घोगळे यांनी केले आहे.
यावेळी श्री वैभव घोगळे, श्यामसुंदर मालवणकर, हेमंत पांगम, मधुकर भाईडकर, अशोक कोरगावकर, दीपा पार्सेकर, श्री. पारकर, अश्रफ शेख, आबा धुरी, विलास नारकर, निलेश घावनळकर आणि इतर व्यावसायिक उपस्थित होते.
Latest Marathi News सिंधुदुर्गात गोभी मंच्युरियनमध्ये फूड कलर न वापरण्याचा निर्धार! Brought to You By : Bharat Live News Media.