‘भारताला नवं व्हिजन हवं असले तर अब की बार भाजप तडीपार’ : राहुल गांधींचा नारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सभेचा आज समारोप सभा आज शिवाजी पार्क येथे पार पडली. यावेळी अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, लोक विचार करतात की आपण सगळे एका राजकीय विचारधारेवर चाललोय पण असं नाहीए. भारतातील प्रत्येक तरुणाला हे समजत असेल हे सगळे लोक मोदींच्या … The post ‘भारताला नवं व्हिजन हवं असले तर अब की बार भाजप तडीपार’ : राहुल गांधींचा नारा appeared first on पुढारी.
‘भारताला नवं व्हिजन हवं असले तर अब की बार भाजप तडीपार’ : राहुल गांधींचा नारा


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सभेचा आज समारोप सभा आज शिवाजी पार्क येथे पार पडली. यावेळी अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, लोक विचार करतात की आपण सगळे एका राजकीय विचारधारेवर चाललोय पण असं नाहीए. भारतातील प्रत्येक तरुणाला हे समजत असेल हे सगळे लोक मोदींच्या विरोधात आहोत. भारताला नवं व्हिजन हवं असेल तर अब की बार भाजप तडीपार असा नारा द्यावा
ते म्हणाले की, गेल्या वर्षी आम्ही काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत यात्रा काढली. ही यात्रा पुन्हा काढण्याचे कारण की, या देशातील कम्युनिकेशन साधण्यासाठीचा मीडिया हा सत्ताधारींच्या हातात आहे. त्यामुळे आम्हाला जनतेत यावे लागले आहे. जेलमध्ये जाण्याच्या भीतीने अनेक नेते भाजपमध्ये जात आहेत. ५६ इंचाची व्यक्ती नाही तर पोकळ व्यक्ती आहे अशी टीका मोदींवर केली. जर भारताला नवं व्हिजन द्यावं लागणार असलेल अब की बार भाजप तडीपार हा नारा द्यावाच लागेल.
फक्त २२ लोकांकडे ७० कोटी लोकांएवढी संपत्ती आहे. केवळ ९० देश लोक चालवत आहेत. एका लग्नासाठी एअरपोर्टला आंतरराषट्रीय दर्जा दिला जात असल्याची टीका राहुल गांधीनी यावेळी केली. देशात फक्त उद्योगपतींना मोठं करण्याचं काम सुरु आहे. बेरोजगारी, महागाई या गंभीर समस्या देशासमोर आहेत. मोदींकडे देशातील भ्रष्टाचाराची मक्तेदारी आहे. मोदी केवळ लक्ष भटकवत आहेत. ईव्हिएमशिवाय मोदी निवडणूक जिंकू शकत नाहीत. हे वास्तव आहे. निवडणूक रोख्यांतून कोट्यावधींचा घोटाळा बाहेर येत आहे.
हा देश द्वेशाचा नाही तर प्रेमाने भरलेला आहे. नफरत की बाजार में मोहोब्बत की दुकान खोलो. हे मी नाही तर भारताती अनेक संत महात्मे, महा-पुरुषांनी सांगितले आहे असे प्रतिपादन राहुल गांधी यांनी केले.
 
 
The post ‘भारताला नवं व्हिजन हवं असले तर अब की बार भाजप तडीपार’ : राहुल गांधींचा नारा appeared first on Bharat Live News Media.

Go to Source