Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल झाली .या निमित्ताने इंडिया आघाडीने लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे आयोजित विराट सभेत फोडण्यात आला. यावेळी इंडिया आघाडीच्या सभेसाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि डीएमके नेते एम. के. स्टॅलिन, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे उपस्थित राहीले. ही सभा विराट असेल, असा दावा या सभेच्या समन्वय समितीचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
छोडो भाजप हाच आमचा निर्धार : शरद पवार
यावेेळी बोलताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार म्हणाले की, देशात परिवर्तनाची गरज आहे, देशात दुही माजवणाऱ्या लोकांना सत्तेतून हाकलावे लागेल. ज्यांच्याकडे देशाची सत्ता आहे त्यांनी तरुम शेतकरी कामगार यांना केवळ आश्वासने दिली. मात्र त्यांची पुर्तता कधीच केलेली नाहीत. देशाच्या स्थितीत बदल घडवण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले. मोदींनी दिलेली गॅरंटी ही कधीच पूर्ण न होणारी आहे. मोदींची गॅरंटी चालणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. महात्मा गांधीनी ब्रिटिशांविरोधात छोडो भारतचा नारा दिलेला होता,. आम्ही देखील छोडो भाजप असा नारा देशभरात करणार आहोत. असा निर्धार पवार यांनीू केला.
सगळे एकवटतात तेव्हा हुकशाहीचा अंत : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, भाजपच्या फुग्यात हवा भरल्याचं दु:ख आहे. महात्मा गांधीनी चले जाव इथूनच सांगितले होते त्याच ठिकाणी आज भारत जोडो यात्रेच्या समारोप पार पडला. सगळे एकवटतात तेव्हा हुकशाहीचा अंत होतो. हातात मशाल घेऊन आम्ही रणशिंग फुंकले असल्याचे देखील ठाकरे यावेळी म्हणाले.
The post ‘इंडिया’ आघाडीने फुंकले लोकसभा प्रचाराचे बिगुल; शिवाजी पार्कवर विराट सभा appeared first on Bharat Live News Media.