छत्रपती संभाजीनगर: साक्षरतेचे धडे गिरविणाऱ्या निरक्षरांची ८८० केंद्रांवर परीक्षा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जून २०२३ पासून नवभारत साक्षरता अभियान राबविले जात आहे. यामध्ये ३५ वर्षांवरील निरक्षर व्यक्तींना साक्षरतेचे धडे दिले जात आहेत. जिल्ह्यात एकूण १५ हजार ५४७ निरक्षरांना शोधून त्यांना स्वयंसेवकांमार्फत प्राथमिक शिक्षण दिले जात आहे. नऊ महिने हे धडे गिरविल्यानंतर रविवारी जिल्ह्यातील ८८० केंद्रांवर या सर्वांची परीक्षा घेण्यात आली. … The post छत्रपती संभाजीनगर: साक्षरतेचे धडे गिरविणाऱ्या निरक्षरांची ८८० केंद्रांवर परीक्षा appeared first on पुढारी.

छत्रपती संभाजीनगर: साक्षरतेचे धडे गिरविणाऱ्या निरक्षरांची ८८० केंद्रांवर परीक्षा

छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जून २०२३ पासून नवभारत साक्षरता अभियान राबविले जात आहे. यामध्ये ३५ वर्षांवरील निरक्षर व्यक्तींना साक्षरतेचे धडे दिले जात आहेत. जिल्ह्यात एकूण १५ हजार ५४७ निरक्षरांना शोधून त्यांना स्वयंसेवकांमार्फत प्राथमिक शिक्षण दिले जात आहे. नऊ महिने हे धडे गिरविल्यानंतर रविवारी जिल्ह्यातील ८८० केंद्रांवर या सर्वांची परीक्षा घेण्यात आली. दीडशे गुणांच्या या परीक्षेत वाचन, लेखन आणि संख्या ज्ञान यावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. Chhatrapati Sambhajinagar News
केंद्र सरकारने गतवर्षी नवभारत साक्षरता अभियान सुरू केले. राज्याच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून हे अभियान राबविले जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिक्षणाधिकारी (योजना) अरुणा भूमकर यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान सुरू आहे. सुरुवातीला जिल्ह्यात शिक्षक आणि स्वयंसेवकांमार्फत निरक्षर व्यक्तींचा शोध घेण्यात आला. त्यानंतर या निरक्षर व्यक्तींना स्वयंसेवकांमार्फत शिक्षण दिले गेले. पहिल्या टप्प्यात या सर्वांना वाचन, लेखन आणि संख्या ज्ञान याचे धडे देण्यात आले. आता वर्षभरानंतर या सर्वांची परीक्षा घेण्यात आली. रविवारी जिल्ह्यातील ८८० केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. Chhatrapati Sambhajinagar News
लाडसावंगी केंद्रांतर्गत एकूण १७८ जणांनी ही परीक्षा दिली. निरक्षरांची ज्या शाळेतून नोंद झालेली होती, त्याच शाळेत परीक्षेचे केंद्र ठेवण्यात आले होते. लाडसावंगी, भोगलवाडी २, औरंगपूर, गवळीमाथा, उबाळे मळा, चारठा, शेलूद, पेठावरील वस्ती, पवार मळा, जिनिंग प्रेसिंग, पळखुटा, हातमाळी, सय्यदपूर आदींसह केंद्रातील १०१ स्त्रीया आणि ७७ पुरुषांनी ही परीक्षा दिली. एकूण दीडशे गुणांची परीक्षा झाली. वाचन लेखन व संख्या ज्ञान या विषयांची परीक्षा प्रत्येकी पन्नास गुणांची होती. परीक्षेला उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान सतरा गुण आवश्यक होते. उत्तीर्ण झाल्यावर निरक्षरांना साक्षरतेचे प्रमाणपत्र मिळणार आहे. गटशिक्षणाधिकारी दीपाली थावरे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख वैजिनाथ चौधरी, स्वाती श्रीकांत, महेंद्र बारवाल, गणेश शिंदे, रऊफ शेख, संतोष पवार, गोपाल शिंदे, नामदेव पवार, बाबासाहेब जाधव, दीपा देशपांडे, विजय बैनाडे, परमेश्वर चोरमारे, संजय भालेराव, कडूबा साळवे, लक्ष्मीकांत कीर्तिकर, विठ्ठल सोनवणे, राजू कालोद आदींनी परिश्रम घेतले.
Chhatrapati Sambhajinagar News वडगाव कोल्हाटी येथे नवसाक्षरांचा मोठा प्रतिसाद
वडगाव कोल्हाटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घेण्यात आली. औद्योगिक वसाहतीत मोलमजुरी करत असतानाही अक्षरे, अंक व चित्रमय लिपीच्या माध्यमातून साक्षर होण्याची धडपड आज परीक्षेस मिळालेल्या प्रतिसादावरून दिसून आली. शाळेत परीक्षा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुनील चिपाटे, विद्या सोनोने, सोनाली निकम, मंगल गाडेकर, लईक शेख, दीपाली काळबांडे, योगिता देवकाते, हेमलता जाधव आदींनी परिश्रम घेतले.
हेही वाचा 

छ.संभाजीनगर: येसगावजवळ छोटा हत्ती – दुचाकीच्या धडकेत तरुण ठार, १ जण जखमी
छ.संभाजीनगर: पैठण तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; दुचाकीसह लाखोंचा मुद्देमाल लंपास
छ.संभाजीनगर : सिद्धेश्वर साखर कारखाना निवडणूक; २१ जागांपैकी ६ जागा बिनविरोध

Latest Marathi News छत्रपती संभाजीनगर: साक्षरतेचे धडे गिरविणाऱ्या निरक्षरांची ८८० केंद्रांवर परीक्षा Brought to You By : Bharat Live News Media.