भाजप नेते अशोक चव्हाण यांनी मध्यरात्री घेतली मनोज जरांगेंची भेट
वडीगोद्री, Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्याचे माजी मुख्यमंत्री व भाजपाचे नेते अशोक चव्हाण यांनी अंतरवाली सराटीत मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की,मी नांदेडला चाललो होतो,चलता चलता मी मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आलो होतो.सुरुवातीला उद्धव ठाकरे आणि मी आलो होतो. त्यावेळी भेट झाली होती.समाजाचा विषय आहे आणि चर्चा करून मार्ग निघाला पाहिजे आणि ही भूमिका माझी पहिल्यापासून आहे.सद्य स्थितीवर मार्ग कसा काढायचा यावर चर्चा करण्यासाठी आलो होतो. Manoj Jarang – Ashok Chavan
मनोज जरांगे यांच्या समाजाच्या मागण्या आहेत आणि रास्त आहे त्यामध्ये काही तोडगा निघाला पाहिजे, आणि ही माझी भूमिका आहे.मराठा आरक्षण, लोकसभा निवडणूक याचा काही विषय नाही आणि मी उमेदवार पण नाही.आरक्षण हा विषय समाजाचा असल्याने या सगळ्या गोष्टीचा मार्ग निघाला पाहिजे, अशी माझी भूमिका पहिल्यापासूनच आहे. त्यामुळे आज फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आणि सद्यस्थितीत मार्ग कसा काढायचा. याबाबत चर्चा करायला आलो होतो. लोकसभा निवडणूक आणि या चर्चेचा काही संबंध नाही. मी लोकसभेचा उमेदवारही नाही. जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करायला आलो आहे.निवडणूक म्हणुन आलो असा कोणताही विषय नाही.या माझ्या समाजाच्या मागण्या ह्या रास्त आहेत. त्यावर योग्य तो मार्ग निघाला पाहिजे.तो मार्ग कसा काढता येईल यावर चर्चा करण्यासाठी आलो होतो. Manoj Jarang – Ashok Chavan
कॅबिनेटच्या बैठकीत काय निर्णय झाला. कोणत्या मागणी मान्य झाल्या नाही झाले या सांगता येणार नाहीत. मी कॅबिनेटमध्ये नाही.
सगे सोयरे कायदा अंमलबजावणी या प्रश्नातून मार्ग कसा काढायचा,या सगळ्या गोष्टी एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही प्रक्रिया आचारसंहितेमुळे पुढे जाईल की नाही हे सांगता येणार नाही. त्यावर नंतर भाष्य केलेले बरे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे काही जागांवर मराठा आरक्षणामुळे धक्का पोहोचू शकतो याबाबत काही चर्चा झाली का यावर बोलताना ते म्हणाले वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी परिस्थिती आहे.ते सांगणे कठीण आहे असेही भाजपा नेते अशोक चव्हाण म्हणाले.
हेही वाचा
बीड : मनोज जरांगे यांच्यासह २०० जणांवर गुन्हे दाखल
माझी मान कापली तरी मी एक इंचही मागे हटणार नाही, ओबीसीतूनच मराठा आरक्षण : मनोज जरांगे पाटील
‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील चित्रपटाचा धमाकेदार टीजर
Latest Marathi News भाजप नेते अशोक चव्हाण यांनी मध्यरात्री घेतली मनोज जरांगेंची भेट Brought to You By : Bharat Live News Media.