हिंगोली : कारच्या धडकेत बोरी सावंतचा दुचाकीस्वार ठार
हट्टा: Bharat Live News Media वृत्तसेवा: हिंगोलीकडून परभणीकडे जाणार्या कारने दुचाकीस जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना हिंगोली-परभणी राज्य मार्गावर आज (दि.१७) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. साहेबराव महाले (वय ५५, रा. बोरी सावंत) असे मृताचे नाव आहे. या अपघातात दुचाकीसह कारचे मोठे नुकसान झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोली-परभणी राज्य मार्गावर आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हिंगोलीकडून परभणीकडे जाणार्या कारने (एम.एच.44 एस 6544) भरधाव वेगाने समोरून येणार्या दुचाकीस्वारास जोराची धडक दिली. या धडकेत येथील साहेबराव महाले हे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा
हिंगोली: कांडली येथील तरुणाने मराठा आरक्षणासाठी जीवन संपवले
हिंगोली : बेपत्ता मुलाचा तलावात सापडला मृतदेह
हिंगोलीत अल्पवयीन मुलाचे अपहरण गुन्हा दाखल
Latest Marathi News हिंगोली : कारच्या धडकेत बोरी सावंतचा दुचाकीस्वार ठार Brought to You By : Bharat Live News Media.