मोठी बातमी: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून इलेक्ट्रोरल बाँड्सचा नवीन डेटा प्रसिद्ध

पुढारी ऑनलाईन डेस्क:  सर्वोच्च न्यायालयाने सीलबंद कव्हरमध्ये दिलेला इलेक्ट्रोरल बाँड्सचा (निवडणुक रोखे) नवीन डेटा निवडणूक आयोगाने आपल्‍या वेबसाइटवर अपलोड केला आहे. यामध्ये राजकीय पक्षांना निधीसंदर्भातील डेटा असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. (Electoral bonds data) यापूर्वी १४ मार्च रोजी निवडणूक आयोगाने अपलोड केलेला इलेक्ट्रोरल बाँड्सचा (निवडणुक रोखे) डेटा आणि … The post मोठी बातमी: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून इलेक्ट्रोरल बाँड्सचा नवीन डेटा प्रसिद्ध appeared first on पुढारी.

मोठी बातमी: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून इलेक्ट्रोरल बाँड्सचा नवीन डेटा प्रसिद्ध

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क:  सर्वोच्च न्यायालयाने सीलबंद कव्हरमध्ये दिलेला इलेक्ट्रोरल बाँड्सचा (निवडणुक रोखे) नवीन डेटा निवडणूक आयोगाने आपल्‍या वेबसाइटवर अपलोड केला आहे. यामध्ये राजकीय पक्षांना निधीसंदर्भातील डेटा असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. (Electoral bonds data)
यापूर्वी १४ मार्च रोजी निवडणूक आयोगाने अपलोड केलेला इलेक्ट्रोरल बाँड्सचा (निवडणुक रोखे) डेटा आणि सध्या अपलोड केलेला डेटा यांमध्ये काय फरक आहे, हे स्पष्ट झालेले नाही. शुक्रवार १५ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यावेळी १७ मार्च सायंकाळी ५ वाजेपर्यंत निवडणुक आयोगाने सर्व डेटा अपलोड करावा असा आदेश दिला होता. दरम्यान आज दुपारीच निवडणूक आयोगाने उर्वरित डेटा त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे. निवडणूक आयोगाने 19 एप्रिल ते 1 जून या सात टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्याच्या एका दिवसानंतर ही आकडेवारी जाहीर केली आहे. (Electoral bonds data)

The Election Commission of India has today uploaded the data received in digitized form from the registry of the Supreme Court on electoral bonds on its website: Election Commission of India pic.twitter.com/YIQo5Rq3qQ
— ANI (@ANI) March 17, 2024

Public disclosure by ECI of the data relating to electoral bonds as
returned by the Supreme Court registry can be found at this link : https://t.co/VTYdeSLhcg pic.twitter.com/x1BANQDjfx
— Spokesperson ECI (@SpokespersonECI) March 17, 2024

निवडणूक रोख्यांची माहिती असणारे हे सीलबंद लिफाफे निवडणूक आयोगाने १२ एप्रिल २०१९ आणि २ नोव्हेंबर २०२३ ला सर्वोच्च न्यायालयात सादर केले होते. पण निवडणूक आयोगाने यांच्या प्रती स्वतःकडे ठेवलेल्या नव्हत्या. त्यामुळे निवडणूक आयोगाने ही सीलबंद लिफाफे परत देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयात केली होती. यावर शुक्रवारी निवडणूक आयोगाला लिफाफे परत देण्याबद्दलच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने रजिस्ट्रीला केल्या होत्या. यातील माहिती रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने आज दुपारी ३. ३० वाजता हा डेटा त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे.
निवडणूक रोखे (इलेक्ट्रोरल बाँड) संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना २०१९ आणि २०२३ मध्ये हे लिफाफे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यालयात सादर केले होते. शुक्रवारी जी सुनावणी झाली त्यात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाला रोख्यांचे नंबर न दिल्याने फटकारले होते. १२ एप्रिल २०१६ला निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात जो सीलबंद लिफाफा सादर केला आहे, त्यात १०६ सीलबंद लखोटे आहेत. तर २ नोव्हेंबर २०२३ ला सादर केलेल्या सीलबंद लिफाफ्यात ५२३ लखोटे आहेत, अशी बातमी द हिंदूने दिलेली आहे.
हेही वाचा:

Electoral Bonds | इलेक्टोरल बाँड्सचे नंबर उघड न केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाची SBI ला नोटीस
Electoral Bonds | ‘लॉटरी किंग’, ‘ED टार्गेट’! कोण आहेत सँटियागो मार्टिन?, ज्यांनी राजकीय पक्षांना दिली सर्वाधिक १,३६८ कोटींची देणगी
Electoral Bonds Data : इलेक्टोरल बाँड्सचा डेटा उघड! सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाकडून आकडेवारी जाहीर

Latest Marathi News मोठी बातमी: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून इलेक्ट्रोरल बाँड्सचा नवीन डेटा प्रसिद्ध Brought to You By : Bharat Live News Media.