पीटीएसडी म्हणजे काय?
डॉ. मनोज शिंगाडे
पीटीएसडी ही एक अशा प्रकारची समस्या आहे की, आपल्या मेंदूत मागे घडलेल्या घटनांचे पडसाद वर्तमान काळात उमटत असतात. अभ्यासकांच्या मते, लहानपणी मनावर झालेला आघात किंवा कौटुंबिक तणावामुळे अशा प्रकारचा आजार होऊ शकतो. या आजारातून बरे होता येते. केवळ रुग्णाची तयारी असावी लागते. रुग्णास जेवढे लवकर या आजारातून बाहेर काढता येईल, तेवढे त्याच्या भविष्यासाठी आणि आरोग्यासाठी योग्य बाब ठरू शकते.
संबंधित बातम्या
झोपेत वाईट स्वप्न पडतात का?, जाणून घ्या पीटीएसडीची लक्षणे
शहरात घरफोडीचे सत्र; लष्कर, भारती विद्यापीठ परिसरातील घटना
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन; शेतकरी संघटनांचा रामलीला मैदानावरील महापंचायत मेळाव्यात निर्धार
पीटीएसडीची लक्षणे
लवकर जाग येणे आणि झोपेत वाईट स्वप्न पडणे
एकच घटना वारंवार दिसणे किंवा आठवण येणे
विसराळूपणा वाढणे किंवा विसरणे
लक्ष केंद्रित करण्यास अडचणी
अचानक खूप राग येणे किंवा कधी हिंसक बनणे
अचानक भीती वाटणे
अचाक अंगदुखी होणे
घबराट किंवा चिंताग्रस्त होणे
कधी कधी अत्यंत भावनिक होणे
घटनेशीसंबंधित घडलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे.
उपचार
आजारी व्यक्तीवर लवकर उपचार करण्यासाठी आणि आघाताचे लक्षण कमी करण्यासाठी डॉक्टर ‘मूड एलिवेटर’ थेरपीचा वापर करतात. यासाठी संमोहनाचा आधार घेतला जातो. या पद्धतीमुळे अनेक रुग्णांत सुधारणा झाल्याचे सांगितले जाते.
मानसशास्त्रीय पद्धत
संज्ञानात्मक व्यवहार थेरपी (कॉगनेटिव्ह बिहेव्हरल थेरेपी) : ही एक वैज्ञानिक संवादाची प्रक्रिया आहे. या माध्यमातून आयुष्यात घडलेल्या किंवा अनुभवास आलेल्या वाईट घटनांबाबत संवाद साधला जातो. याबाबत असलेल्या चुकीच्या विचारांबाबत रुग्णाशी चर्चा केली जाते.
आघातकेंद्रित सीबीटी
या प्रक्रियेत पीडित व्यक्तीला आघाताबाबत बोलण्यास प्रोत्साहित केले जाते. त्याचे मत जाणून घेतले जाते आणि तो कशा पद्धतीने विचार करतो, हे जाणून घेतले जाते. त्यानुसार या प्रक्रियेच्या माध्यमातून त्याच्या मनातील चिंता, भय दूर करण्याचा प्रयत्न केला जातो.
नेत्र विचेतन आणि पुनर्लोकन
या प्रक्रियेत डॉक्टर हे पिडित व्यक्तीला आपल्या बोटाकडे पाहण्यास सांगतात. या बोटाकडे पाहत आघाताबाबत, घटनेबाबत बोलण्यास सांगतात. या पद्धतीतून केलेल्या उपचाराने रुग्णास फायदा होण्याची अधिक शक्यता असते. ‘ पीटीएसडी ’ मध्ये ही उपचार पद्धत सर्वात उपयुक्त ठरलेली आहे.
Latest Marathi News पीटीएसडी म्हणजे काय? Brought to You By : Bharat Live News Media.