परभणी: आहेरवाडी शिवारात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: झिरोफाटा ते पूर्णा रस्त्यावरील आहेरवाडी शेतशिवार आश्रम शाळेजवळील शेतात एका अनोळखी (वय अंदाजे ५०) व्यक्तीचा कुजलेल्या आणि निवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना शनिवारी (दि.१६) सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली. याबाबत अधिक माहिती अशी की, आहेरवाडी शिवारात एक बंद पडलेली आश्रम शाळा आहे. येथे आहेरवाडी येथील … The post परभणी: आहेरवाडी शिवारात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह appeared first on पुढारी.

परभणी: आहेरवाडी शिवारात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

पूर्णा, Bharat Live News Media वृत्तसेवा: झिरोफाटा ते पूर्णा रस्त्यावरील आहेरवाडी शेतशिवार आश्रम शाळेजवळील शेतात एका अनोळखी (वय अंदाजे ५०) व्यक्तीचा कुजलेल्या आणि निवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना शनिवारी (दि.१६) सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आहेरवाडी शिवारात एक बंद पडलेली आश्रम शाळा आहे. येथे आहेरवाडी येथील मोरे कुटुंबीयांची शेती आहे. शनिवारी सायंकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान मोरे यांच्या शेतात काम करणारा सालगडी संतोष मोरे यांना काहीतरी सडलेला वास येवू लागला. तो वासाचा दिशेने शोध काढत पुढे गेला असता ज्वारीच्या पिकात एक पुरुष जातीचा विवस्र अवस्थेतील अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. आहेरवाडीचे पोलीस पाटील बालाजी मोरे यांनी याची माहिती पूर्णा पोलीस ठाण्यात दिली. तोपर्यंत घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील, पूर्णा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे, फौजदार केंद्रे, श्याम कुरील, शेंबेवाड दाखल झाले.
मृतदेहाला दुर्गंधी येत असल्याने मृतदेहाचे घटनास्थळी शवविच्छेदन करण्यासाठी पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांना पाचारण केले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याची ओळख पटवण्यात अडचणी येत होत्या. ही व्यक्ती नेमकी कोण आहे? कुठली आहे? त्याचा मृत्यू कशामुळे झाला? त्यास कोणी मारुन टाकले का? याचा तपास पूर्णा पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, चार पाच दिवसांपूर्वी येथील परिसरात एक अनोळखी वेडसर व्यक्ती फिरत असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा 

परभणी : जनशताब्दी एक्सप्रेसचे सेलू रेल्वे स्थानकात स्वागत
परभणी: पूर्णा येथील रेल्वे उड्डाणपूलाचा रस्ता ठरतोय जीवघेणा; ठेकेदाराचे दुर्लक्ष
परभणी : झिरोफाटा, भारती कॅम्पजवळ कार उलटली; तलाठी ठार, ५ जण जखमी

Latest Marathi News परभणी: आहेरवाडी शिवारात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह Brought to You By : Bharat Live News Media.